‘देवबाभळी’चे २ दिवसात ६ प्रयोग!!!!

0

मुंबई,२ जुलै २०२३ -‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’ची ५५ वी विठूसावळी नाट्यकृती सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त “संगीत देवबाभळी” या नाटकाने नुकतेच दोन दिवसात सहा प्रयोग म्हणजेच २९ जुलै रोजी ३ प्रयोग पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर, भरत नाट्यमंदिर आणि निळू फुले रंगमंदिर, सांगली येथे आणि ३० जुलै रोजी रवींद्र नाट्यमंदिरातील शेवटचेच सलग ३ प्रयोग सकाळी, दुपारी आणि रात्री असे सादर केले.

असे २ दिवसात सलग डबल हॅट्रिक करणारे हे कदाचित मराठी रंगभूमीवरील एकमेव नाटक असेल. पुणे आणि मुंबई येथील प्रेक्षकांनी या ६ प्रयोगांना अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

देवबाभळीचा शेवटचा प्रयोग २२ नोव्हेंबर २०२३ रोजी होत असून आता १०० दिवसात शेवटचेच ५० प्रयोग राहिले आहेत. अशा पद्धतीने नाटकाच्या शेवटच्या प्रयोगाची तारीख सांगून भद्रकाली संस्थेने प्रेक्षकांच्या इच्छेचा सन्मान केला आहे. नाहीतर अनेकदा नाटक थांबवल्यावर प्रेक्षकांना कळवलं जातं.देवबाभळी नाटकाने अनेक विक्रम आणि पुरस्कार पटकवले आहेत. खऱ्या अर्थाने हे नाटक रसिकांचे झाले आहे असे रंगकर्मींचेही मत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!