Chandrayaan 3 Moon Images:चांद्रयान 3 ने पाठवली चंद्राची पहिली छायाचित्रे

0

श्रीहरीकोटा,दि.७ ऑगस्ट २०२३ –चांद्रयान-3 ने चंद्राचे पहिले छायाचित्र पाठवले आहे. भारताचे चांद्रयान-3 ने ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे. हे १४ जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. जेव्हा हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करत होते तेव्हा चंद्र असा दिसत होता. या मिशनसाठी 23 ऑगस्ट ही सर्वात महत्त्वाची तारीख आहे.या दिवशी चांद्रयानाला दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करायचे आहे.

इस्रोने प्रथमच चंद्राची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.चांद्रयानाने चंद्राची खास छायाचित्रे घेतली आहेत.चांद्रयान 3 ने ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. आता चांद्रयानवर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याने चंद्राच्या पृष्ठभागाची अप्रतिम छायाचित्रे टिपली आहेत. इस्रोने ४५ सेकंदांचा व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला चंद्राच्या पृष्ठभागावर निळ्या आणि हिरव्या रंगाचे अनेक खड्डे दिसतील. आपणास सांगूया की ९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता चांद्रयान चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश करेल.यानंतर १४ ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्राच्या चौथ्या कक्षेत प्रवेश करेल. १६ ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्राच्या पाचव्या कक्षेत पोहोचेल.

यानंतर चांद्रयानचे सॉफ्ट लँडिंग केले जाईल. चांद्रयान 3 चे सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी इस्रो ही जगातील पहिली अंतराळ संस्था बनेल. चांद्रयान 3, २३ ऑगस्ट २०२३ च्या संध्याकाळी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल अशी अपेक्षा आहे. हे सर्वात मोठे आव्हान आहे.

तत्पूर्वी, इस्रोने शनिवारी पुष्टी केली की चंद्र ऑर्बिट इंजेक्शन (LOI) IST संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पार पाडले गेले आणि यानाला चंद्राच्या स्थिर कक्षेत ठेवले. १४ जुलै २०२३ रोजी सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM-3 रॉकेटवर प्रक्षेपित झालेल्या चांद्रयान-3 ने पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराळात तीन लाख किलोमीटरहून अधिक अंतर कापले आहे.या यानाने 1 ऑगस्ट रोजी पृथ्वीभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण केली आणि चंद्राच्या दिशेने आपला ट्रान्स-लूनर प्रवास सुरू केला.

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!