मुंबई: एमजी मोटर इंडियाने आज आगामी मिड साइज एसयूव्ही अॅस्टर (Astor) मध्ये समाविष्ट असलेल्या इंडस्ट्रीतील पहिल्या पर्सनल एआय असिस्टंट आणि फर्स्ट इन सेगमेंट ऑटोनॉमस लेव्हल २ तंत्रज्ञानाचे अनावरण केले. संधी आणि सेवांच्या कार-अॅझ अ प्लॅटफॉर्म (CAAP) च्या संकल्पनेवर आधारीत ऑटो-टेक घटकावर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट एमजीने ठेवले आहे.
एमजी सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सारख्या नवोदित तंत्रज्ञानावर काम करत आहे. जेणेकरून ग्राहकांसाठीच्या सेवा आणि सबक्रिप्शनचा विकास तसेच कार्यान्वयन होईल. त्यासोबतच त्यांच्या ‘ऑन-डिमांड इन-कार’ गरजा पूर्ण करता येतील. कंपनीच्या जागतिक पोर्टफोलिओत पर्सनल एआय असिस्टंट मिळालेली अॅस्टर ही पहिलीच कार आहे.
पर्सनल एआय असिस्टंट हे प्रसिद्ध अमेरिकन फर्म ‘स्टार डिझाइन’ने तयार केले आहे. यात मानवासारख्या भावना आणि आवाज काढले जातात. तसेच विकिपीडियाद्वारे प्रत्येक विषयावर तपशीलवार माहिती मिळते. हे तंत्रज्ञान कारमधील लोकांशी जोडले जाईल. त्यात आय-स्मार्ट हबची सुविधाही आहे. या प्लॅटफॉर्मवर CAAP च्या पार्टनरशिप, सेवा आणि सबक्रिप्शन असेल. याद्वारे ग्राहकांना त्यांच्या सेवांचा समूह पर्सनलाइज करण्याची संधी मिळेल.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी श्री राजीव छाबा म्हणाले, “ऑटो-टेक ब्रँड म्हणून आम्ही नेहमीच यशस्वी तंत्रज्ञान आधी सादर केले आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेतही आम्ही पुढे जात आहोत. अॅस्टर ही एक पाऊल पुढे असून ग्राहकांना प्रीमियम/लक्झरी सेगमेंटमध्येच मिळणाऱ्या इंडस्ट्री फर्स्ट आणि सर्वोत्तम श्रेणीतील वैशिष्ट्यांसह एक क्रांती घडवून आणेल. उत्पादनांच्या केंद्रस्थानी असलेल्या नूतनाविष्कार आणि सॉफ्टवेअरच्या अखंड पाठपुराव्यामुळे, आमची वाहने एआयचा लाभ घेत अधिक स्मार्ट आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव देत राहतील.”ऑटोनॉमस लेव्हल २ एमजी अॅस्टर ही मिड रेंज रडार आणि मल्टी पर्पज कॅमेऱ्याची सुविधेने युक्त असल्याने, यात (एडीएएस) अर्थात अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टिमच्या मालिकेचा अनुभव घेता येऊ शकतो. यात अॅडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फॉरवर्ड कोलायजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी बँकिंग, लेन कीपिंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन डिपार्चर प्रिव्हेन्शन, इंटेलिजंट हँडलँप कंट्रोल, रिअर ड्राइव्ह असिस्ट आणि स्पीड असिस्ट सिस्टीम आदींचा समावेश आहे.
या सुविधांद्वारे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होऊ शकते. भारतातील वाहतुकीच्या दृष्टीने ते अधिक अनुकूल करण्यात आले आहे.भारतात प्रथमच एमजीने अनेक संधींसह CAAP चे सादरीकरण केले आहे. विविध इन-कार सेवांची यंत्रणा तयार करत हे सबक्रिप्शन्स आणि सेवांना होस्ट करते. यात मॅपमायइंडियासोबत नकाशे व नेव्हिगेशन, जिओ कनेक्टिव्हिटी, कोईनअर्थद्वारे ब्लॉकचेन संरक्षित वाहन डिजिटल पासपोर्ट आणि इतर बऱ्याच सुविधा समाविष्ट आहेत.
एमजीच्या कारमालकांना जिओसावन अॅपवर म्युझिक ऐकता येईल आणि कारमध्ये हेट युनिटद्वारे (पार्क+ द्वारे समर्थित – सुरुवात करण्यासाठी शहरांची निवड करावी ) पार्किंग स्लॉट आरक्षित करण्याचे इंडस्ट्रीतील पहिले वैशिष्ट्य देण्यात आले आहे. CAAP मध्ये कालांतराने अनेक संधी विकसित होतील. याद्वारे ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होईल.