भाजपा नेते निलेश राणेंनी घेतला मोठा निर्णय : नारायण राणेंसह भाजपाला धक्का!

0

मुंबई,दि. २४ ऑक्टोबर २०२३ – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या निर्णयामुळे नारायण राणेंसह भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवरुन म्हणजेच ट्वीटरवरुन निलेश राणेंनी सक्रीय राजकारणामधून निवृत्तीची घोषणा केली आहे.निलेश राणेंच्या समर्थकांसाठी ही मोठी धक्कादायक बातमी असल्याची चर्चा कोकणच्या राजकारणामध्ये सुरु आहे.

निलेश राणेंनी आजच दसऱ्याच्या दिवशी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आपल्या ट्वीटर हॅण्डलवरुन पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये निलेश राणेंनी, “मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही,”असं म्हणत निवृत्तीची घोषणा केली आहे.

निलेश राणेंनी काय लिहिले आहे आपल्या पोस्ट मध्ये 
मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे,
आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.
मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!