अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नाशिक जिल्हा समिती प्रमुखपदी अमित कुलकर्णी
विभागीय समिती प्रमुखपदी शाम लोंढे, तर मुख्य समन्वयकपदी सुनील ढगे यांची निवड

नाशिक, दि. ५ नोव्हेंबर २०२६ : (Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal) नाशिकच्या कला, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय समितीच्या नियुक्त्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. नाशिक जिल्हा समिती प्रमुखपदी सुप्रसिद्ध कार्यकारी निर्माते अमित कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली असून, विभागीय समिती प्रमुखपदी वास्तुविशारद शाम लोंढे आणि विभागीय मुख्य समन्वयकपदी ज्येष्ठ रंगकर्मी सुनील ढगे यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे नाशिकच्या चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर आणि प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र जारी करण्यात आले आहे. महामंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि संचालक मंडळाच्या एकमताने या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि संचालक मंडळाच्या एकमताने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नाशिक जिल्हा समिती प्रमुखपदी अमित कुलकर्णी यांची विभागीय समिती प्रमुखपदी सुप्रसिद्ध वास्तुविशारद शाम लोंढे तर विभागीय मुख्य समन्वयकपदी ज्येष्ठ रंगकर्मी सुनील ढगे, जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय जळगाव-धुळे विभाग सदस्य म्हणून सुनील नेरकर आणि अहिल्यानगर विभाग सदस्य म्हणून अॅड. बी. आर. जी. गांडोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
🎬 नाशिकमध्ये चित्रीकरणाच्या संधी वाढवण्यात अमित कुलकर्णींचा सिंहाचा वाटा!(Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal)
नाशिकमध्ये चित्रपट निर्मिती आणि चित्रीकरणाच्या संधी वाढविण्यात कार्यकारी निर्माते अमित कुलकर्णी यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी नाशिककडे निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांचा ओढा वाढण्यास मदत झाली आहे. नाशिकमधील निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक स्थळे, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा तसेच विविध चित्रीकरण स्थळांचा उपयोग चित्रपट निर्मितीसाठी व्हावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि चित्रपटाशी संबंधित व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
शाम लोंढे यांचे फिल्मसिटीचे स्वप्न साकार होण्याची अपेक्षा!
सुप्रसिद्ध वास्तुविशारद शाम लोंढे गेल्या अनेक दशकांपासून नाशिकमध्ये स्वतंत्र फिल्मसिटी उभारण्याच्या संकल्पनेसाठी प्रयत्नशील आहेत. नाशिकला चित्रपट निर्मितीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. नाशिकमध्ये फिल्मसिटी उभी राहिल्यास स्थानिक कलाकारांसह तंत्रज्ञ, निर्माते आणि चित्रपट क्षेत्रातील अनेकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यांच्या नियुक्तीमुळे या संकल्पनेला अधिक बळ मिळेल आणि फिल्मसिटीच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने सकारात्मक पावले पडतील, अशी अपेक्षा आहे.
सुनील ढगे यांच्या अनुभवाचा कलावंतांना होणार फायदा!
ज्येष्ठ रंगकर्मी सुनील ढगे हे नाशिकच्या सांस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रातील परिचित नाव आहे. अनेक वर्षांपासून ते कलाकारांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कलाकारांचे प्रश्न, महामंडळाशी संबंधित अडचणी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध विषयांवर समन्वय साधण्यात त्यांचा अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे.
या तिन्ही अनुभवी व्यक्तींसह सुनील नेरकर आणि अॅड. बी. आर. जी. गांडोळे यांच्या सहभागामुळे उत्तर महाराष्ट्रातील चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राला नवी ऊर्जा मिळण्याची अपेक्षा आहे.महामंडळाच्या नव्या समितीसमोर स्थानिक कलाकारांची नोंदणी वाढविणे, चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देणे, कलाकार व तंत्रज्ञांच्या समस्या सोडविणे आणि उत्तर महाराष्ट्रातील चित्रपट क्षेत्राचा विकास करणे अशी महत्त्वपूर्ण आव्हाने असणार आहेत.
उत्तर महाराष्ट्र विभागीय समिती अशी
विभागीय मुख्य समन्वयक – सुनील ढगे
विभागीय समिती प्रमुख – शाम लोंढे
नाशिक जिल्हा समिती प्रमुख – अमित कुलकर्णी
जळगाव-धुळे विभाग सदस्य – सुनील नेरकर
अहिल्यानगर विभाग सदस्य – अॅड. बी. आर. जी. गांडोळे
नवनियुक्त समितीसमोर उत्तर महाराष्ट्रातील कलाकारांची नोंदणी वाढविणे, चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देणे, कलाकार व तंत्रज्ञांच्या समस्या सोडविणे आणि चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी काम करणे अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी असणार आहे.या नियुक्त्यांमुळे नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात आनंद व्यक्त होत असून, सर्व स्तरांतून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. नाशिकच्या कलाविश्वाला नवी दिशा, चित्रपट निर्मितीला नवी संधी आणि फिल्मसिटीच्या स्वप्नाला प्रत्यक्ष आकार देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.नाशिकच्या कला, नाट्य आणि चित्रपट क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम ही समिती प्रभावीपणे करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.