आजचे राशिभविष्य बुधवार,३ जानेवारी २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी.हेमंत ऋतू. 
राहुकाळ -दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज उत्तम दिवस आहे” 
नक्षत्र – उत्तरा/हस्त. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -कन्या.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक धनलाभाचे योग आहेत. शत्रू पराभूत होतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. व्यसने टाळणे हिताचे आहे.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. प्रतिष्ठा प्राप्त होईल. लेखकांना यश मिळेल.विवाह इच्छुकांना खुश खबर.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) बाग – बगीचाशी संबंध येईल. वाहन सुख लाभेल. चैनीवर खर्च कराल. घरातील महत्वाची कामे पूर्ण होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) विशेष पराक्रम कराल. प्रेमात यश मिळेल. नोकरीत अधिक वेळ द्यावा लागेल. अधिकार वाढतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संपत्ती वाढेल. आर्थिक तरतूद होईल. नवीन वाहन खरेदी होऊ शकते. मात्र दूरच्या प्रवासात काळजी घ्या.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. शुक्रशी शुभ योग करत आहे. महिलांची दागिने खरेदी होईल. मत्सर त्रास जाणवेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. जिज्ञासा वाढेल. ज्ञान प्राप्त होईल. खर्च मात्र वाढणार आहे. रत्ने खरेदी कराल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अर्थप्राप्ती होण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रवास कार्यसाधक होतील. चैनीवर खर्च कराल. मन मोकळे होईल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भौतिक सुखाच्या मागे लागाल. विनाकारण खर्च कराल. संततीशी मतभेद संभवतात. प्रेमात धोका मिळू शकतो.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल शुक्र – चंद्र योग आनंद आणि उत्साह देतील. मन प्रसन्न राहील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. इच्छापूर्ती होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अष्टम स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. मेहनत वाढवावी लागेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दूरचे प्रवास घडतील. पुत्र सुख लाभेल. संपन्नता अनुभवास येईल. हातून उत्तम साहित्यरचना घडू शकेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!