आजचे राशिभविष्य गुरुवार,१९ नोव्हेंबर २०२६  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
कार्तिक शुक्ल नवमी / सकाळी ७.०७ नंतर दशमी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
चंद्र नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
ग्रहयोग – रवी केंद्र मंगल.
आज चांगला दिवस आहे. रवी केंद्र मंगल योगामुळे कामात उत्साह, धाडस आणि निर्णयक्षमता वाढेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल ग्रहमान राहील. मात्र, रागावर नियंत्रण ठेवून संयमाने वागणे हितकारक ठरेल.

राशिभविष्य (Marathi Rashi Bhavishya)

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज कामाच्या बाबतीत उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. प्रवासाचे योग संभवतात. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. मालमत्तेच्या संदर्भात अनुकूल निर्णय होतील. कामाच्या ठिकाणी सावधगिरीने वागावे. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) भागीदारीच्या व्यवसायात लाभ होईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नवीन करार आणि व्यावसायिक निर्णयांसाठी दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.

सिंह:– (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) कामाचा व्याप वाढेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) बौद्धिक आणि कलात्मक क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात अनुकूलता राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घरगुती वातावरण आनंदी राहील. मालमत्तेच्या संदर्भात सकारात्मक निर्णय होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात अनुकूलता राहील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग संभवतात. उत्साहाने कामे केल्यास चांगले परिणाम मिळतील.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील.

मकर:– (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) मित्रमंडळींकडून उत्तम सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. नवीन योजना आखण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) कामाच्या ठिकाणी उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) भाग्याची उत्तम साथ लाभेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होईल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521) 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!