आजचे राशिभविष्य मंगळवार,१७ नोव्हेंबर २०२६ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
ककार्तिक शुक्ल अष्टमी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
विशेष – दुर्गाष्टमी, गोपाष्टमी.
चंद्र नक्षत्र – धनिष्ठा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर / (दुपारी ३.३१ नंतर) कुंभ.
ग्रहयोग – रवी केंद्र चंद्र, चंद्र प्रतियुती मंगळ, चंद्र प्रतियुती गुरू, चंद्र त्रिकोण शुक्र.

आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. सकाळपासून काही कामांमध्ये अडथळे आणि मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे. रवी केंद्र चंद्र आणि चंद्र प्रतियुती मंगळ, गुरू योगामुळे स्वभावात चिडचिड, घाई आणि निर्णयातील गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना संयम बाळगा. चंद्र त्रिकोण शुक्र योगामुळे प्रेमसंबंध, कौटुंबिक जीवन आणि आर्थिक व्यवहारात अनुकूलता राहील. विशेषतः संध्याकाळी ५.०० नंतर परिस्थिती अधिक अनुकूल होईल. रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी आणि नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी संध्याकाळचा वेळ चांगला आहे.

राशिभविष्य (Marathi Rashi Bhavishya)

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नोकरी-व्यवसायात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. जोडीदाराशी संवाद साधताना संयम ठेवा. संध्याकाळनंतर अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) भाग्याची चांगली साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमवाल. नोकरी-व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. दूरच्या प्रवासाचे योग येतील. वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. संध्याकाळनंतर महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घ्या. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. संध्याकाळनंतर परिस्थितीत सुधारणा होईल.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) वैवाहिक जीवनात काही मतभेद निर्माण होऊ शकतात. भागीदारीच्या व्यवसायात सावधगिरी बाळगा. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. नवीन करार करताना घाई करू नका. संध्याकाळनंतर परस्पर सहकार्याने महत्त्वाची कामे पूर्ण होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. नोकरी-व्यवसायात काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. सहकाऱ्यांशी वागताना संयम ठेवा. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करा. संध्याकाळनंतर कामात अनुकूलता येईल.

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. कला आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना चांगले यश मिळेल. संध्याकाळनंतर आनंददायी घटना घडतील.

तूळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कौटुंबिक वातावरणात काही तणाव निर्माण होऊ शकतो. घर आणि मालमत्तेसंदर्भातील निर्णय विचारपूर्वक घ्या. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. घरातील व्यक्तींशी संवाद साधताना संयम ठेवा. संध्याकाळनंतर परिस्थिती सुधारेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) तुमच्या पराक्रमात आणि आत्मविश्वासात वाढ होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. नवीन लोकांशी संपर्क फायदेशीर ठरेल. मात्र, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. संध्याकाळनंतर कामात चांगले यश मिळेल.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात संयमाने काम करा. वाणीवर नियंत्रण ठेवा. संध्याकाळनंतर आर्थिक बाबतीत अनुकूलता निर्माण होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. मात्र, चंद्र प्रतियुती मंगळ आणि गुरू योगामुळे स्वभावात चिडचिड किंवा अतिआत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळतील. संध्याकाळनंतर विशेष अनुकूलता राहील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परदेशाशी संबंधित कामात प्रगती होईल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमवाल. प्रवासाचे योग संभवतात. काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्याने अस्वस्थता जाणवू शकते. महत्त्वाची कामे नियोजनपूर्वक करा. संध्याकाळनंतर मनःशांती लाभेल.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. मात्र, कोणालाही आर्थिक मदत करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. संध्याकाळनंतर रखडलेली कामे मार्गी लागतील.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521) 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!