आजचे राशिभविष्य रविवार,७ जानेवारी २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण एकादशी. हेमंत ऋतू. उत्तरायण. शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज विशाखा वर्ज्य दिवस” *सफला एकादशी*  
चंद्र नक्षत्र – विशाखा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी –  तुळ/वृश्चिक. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नैतिक मार्गाने मार्गक्रमण करावे. उत्तम लाभ होतील. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल.       

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) पूर्वार्ध उत्तम आहे. व्यवसाय वृद्धी होईल. संध्याकाळ शांत आणि आनंदाची. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सर्वतोपरी अनुकूल दिवस आहे. महत्वाची कामे मार्गी लागतील. पूर्वार्ध चांगला आहे.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. घरगुती कार्यक्रमात सहभागी व्हाल. आप्त – मित्र भेटतील. जल पर्यटन घडेल. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  आर्थिक आवक चांगली राहणार आहे. व्यवसायात वाढ होईल. व्यसने टाळावीत.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सरकार दरबारी वजन वाढेल. गृह सौख्य लाभेल. मात्र एखादे अनामिक खर्चाचे काम उभे राहू शकते. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पूर्वार्ध चांगला आहे. वक्तृत्व चमकेल. वकिलांना चांगला दिवस आहे. कलाप्रांतात चमक दाखवाल. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे. अडचणी दूर होऊ लागतील. पर्यटन घडेल. 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवसाचा बहुतांशी कालावधी अनुकूल आहे. महत्वाची कामे पूर्ण करा. संध्याकाळ अवचित खर्चात टाकणारी. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. तुमची कीर्ती पसरेल. मान सन्मान मिळतील. ओळखीतून कामे होतील. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  भ्रमंती घडेल. कामानिमित्त बाहेर गावी जावे लागेल. व्यवसाय वृद्धी होईल. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नेतृत्व गुणांचा उपयोग होईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.