मनोज जरांगे पाटील आक्रमक;फडणवीस यांचे नाव घेत जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले

मनोज जरांगे पाटील'सागर'बंगल्यावर जायला निघाले;अंतरवाली सराटीत गोंधळ

0

जालना,दि,२५ फेब्रुवारी २०२४ – मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.  मला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो, मला मारुन दाखवावं, असं आव्हान मनोज जरांगे यांनी केले आहे.आणि मनोज जरांगे अंतरवाली सराटीतुन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.हातातील सलाईन काढून फेकून देत जरांगे मुंबईकडे निघाल्याने अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळी एकच गोंधळ उडाला.

शिंदे-फडणवीस सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत आंदोलन सुरुच ठेवले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याचदरम्यान, मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी हवा आहे, असा गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर निघाले आहेत.

मनोज जरांगे यांनी आज अंतरावाली सराटीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. काही लोकांना पुढे करुन मला बदनाम करण्याचा डाव सरकारचा असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. मला संपवण्याचं कटकारस्थान होत असेल तर आता मीच मुंबईतील सागर बंगल्यावर येतो, असे म्हणत जरांगे आपल्या जागेवरुन उठले व चालत जाऊ लावले. ते अचानक आंदोलन स्थळावरून उठल्याने कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला. त्यांना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हातातील सलाईन काढून फेकले. सागर बंगल्याकडे जातोय म्हणत ते चालत निघाले आहेत.

जरांगे म्हणाले की, राज्यात जे काही चालू आहे, फडणवीसांमुळेच सुरू आहे. सगेसोयरे अध्यादेश काढण्यासाठी किंवा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास फडणवीसांचा विरोध असल्याचं जरांगे यांनी म्हटले. जरांगे यांनी आपल्या भाषणात फडणवीसांवर गंभीर आरोप करताना, तुम्हाला माझा बळी हवा आहे, मग मी सागर बंगल्याकडे येत आहे. यावेळी, जर रस्त्यातच माझा बळी गेल्यास मला सागर बंगल्यावर नेऊन टाका, असेही जरांगे यानी म्हटले.

आम्ही पण मराठे, नितेश राणे यांनी ललकारलं
मराठा आरक्षणाचे लढणारे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सनसनाटी आरोप केल्यानंतर भारतीय जनता पक्षातले नेते संतप्त झाले आहेत. अंतरवाली सराटीहून सागर बंगल्याच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी पलटवार केला आहे. तुम्ही सागर बंगल्यावर येणार आणि आम्ही काय गप्प बसणार काय? सागर बंगल्याआधी आमची एक भिंत आहे, आधी ती भिंत पार करा, असं आव्हानच आमदार नितेश राणे यांनी दिलं आहे तर जरांगेंच्या स्क्रिप्टचा बोलविता धनी कोण आहे? असा सवाल आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.

मनोज जरांगे हा आधीपासूनच दिशाहीन – छगन भुजबळ
मनोज जरांगे हा आधीपासूनच दिशाहीन आहे. जो दिशाहीन आहे तो दिशा काय ठरवणार?अशा शब्दात  मंत्री छगन भुजबळांनी जरांगेंवर टीका केलीय. सगेसोयरेबाबत सरकार अंमलबजावणी करत नसल्याने आज जरांगेंनी निर्णायक बैठक बोलावलीय.या बैठकीत पुढची दिशा ठरवली जाणार आहे. या बैठकीवरून भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधलाय

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.