नाशिकमध्ये लोकसभेच्या मैदानात मनसे उमेदवार ?;वर्धापनदिनी राज ठाकरे भूमिका जाहीर करणार ?
मनसेच्या वर्धापनदिन सोहळ्यासाठी राज ठाकरे यांचे आज नाशिकमध्ये आगमन
नाशिक दि,७ मार्च २०२४ –महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अठराव्या वर्धापनदिनाच्या सोहळा ९ मार्चला होत आहे.१८ वर्षात पहिल्यांदाच पक्षाचा वर्धापनदिन मुंबई बाहेर होत आहे.नाशिकवर राज ठाकरेंचे असेलेले विशेष प्रेम त्यामुळे हा वर्धापनदिन सोहळा नाशिक मध्ये आयोजित केला आहे.या निमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांसह विविध नेते आज सायंकाळी नाशिकमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरभर स्वागताचे फलक आणि झेंडे लागले आहेत.
नाशिक लोक सभा मतदार संघात मनसे आपला उमेदवार देणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा असून पदाधिकारी तसेच अन्य घटकांची चर्चा करून लोकसभा निवडणुकीबाबत चाचपणी सुरू केली आहे.लोकसभा निवडणुकीत नाशिक मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार देणार का? या बाबत वर्धापनदिनी राज ठाकरे भूमिका जाहीर करणार असल्याचे समजते आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तीन दिवसाच्या नाशिक दौऱ्या निमित्ताने मनसेचे पदाधिकारी पहिल्यांदाच ‘मनसे’एकत्र आलेले दिसत आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक लोकसभा मतदारसंघात रस घेतला आहे. मनसेचे पुणे येथील ॲड. किशोर शिंदे आणि ॲड. गणेश सातपुते यांच्यासह माजी महापौर अशोक मुर्तडक यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
राज ठाकरेंचे आज सायंकाळी ५ :३० वाजता नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत होईल. त्यासाठी पाथर्डी फाटा येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे.