बाबाज् थिएटर्स तर्फे आज “रिव्हायवल” या हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन
गायिका मधुरा बेळे, लेखक व दिग्दर्शक देवेन कापडणीस,चित्रकार व रंगकर्मी स्नेहल एकबोटे यांचा होणार सन्मान

नाशिक,दि,१ एप्रिल २०२४ –बाबाज् थिएटर्स आयोजित व साद स्वरांची निर्मित “रिव्हायवल” या सुमधुर व सुप्रसिद्ध फिल्मी हिंदी गीतांचा कार्यक्रम आज सोमवार, दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास, गंगापूर रोड येथे सादर होणार असून हा कार्यक्रम जेष्ठ नागरिक व सुजाण संगीत प्रेमींसाठी विनामूल्य असणार आहे.
“रिव्हायवल” या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक डॉक्टर प्रमोद शिंदे, मयूर टुकडिया, प्रियांका कोठावदे, विशाल दाते आणि रेणुका बायस हे प्रथितयश कलाकार आपली संगीत सेवा सादर करतील. या कार्यक्रमाचे संयोजन अमोल पालेकर हे करणार असून त्यांना जयेश भालेराव व डॅनियल म्हस्के साथसंगत करणार आहेत. निवेदन किशोरी किण्हीकर करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबाज थिएटर्स तर्फे कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग चे ट्रस्टी श्री. विजय हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते प्रदान करण्यात येईल.
यावेळेस असलेले पुरस्कारार्थी सुप्रसिद्ध गायिका संगीतकार व अध्यापिका सौ मधुरा बेळे, तसेच ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक व दिग्दर्शक श्री.देवेन कापडणीस आणि बहरती चित्रकार व रंगकर्मी स्नेहल एकबोटे हे आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून दर महिन्याच्या एक तारखेला सदर उपक्रम सातत्याने सादर होतो आहे. १ एप्रिल २०२४ रोजी ४१ वे पुष्प मान्यवर रसिकांच्या उपस्थितीत सादर होणार आहे. तरी सर्व रसिकांना या विनामूल्य कार्यक्रमाचे आग्रहाचे निमंत्रण.
सर्व रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन बाबाज थिएटर्सचे प्रशांत जुन्नरे, कैलास पाटील, प्राध्यापक डॉक्टर प्रीतीश कुलकर्णी, एन.सी.देशपांडे, शामराव केदार, जे.पी.जाधव, दिलीपसिंह पाटील, सौ योगिता पाटील आणि डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी केले आहे.

