“सुंदरा मनामध्ये भरली मालिकेची” “वर्षपूर्ती”

0

मुंबई : कलर्स मराठी वरील लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरली ३१ ऑगस्टलाएक वर्ष झाले.बरोबर एक वर्षापूर्वी सुरू झाली. दिलदार प्रेमाची ही वजनदार गोष्ट बघता बघता अवघ्या महाराष्ट्राच्या पसंतीस उतरली. ते म्हणतात ना क्षणात मनामध्ये भरते ते रूप सहवासाने भरते ते स्वरूप अगदी असंच मालिकेमध्ये होताना दिसू लागलं आहे. अभिचं मन सुंदराने म्हणजेच आपल्या लाडक्या लतिकाने जिंकल आहे ते तिच्या समजूतदारपणामुळे आणि स्वभावामुळे. पण, लतिका अभिचं प्रेम स्वीकारेल? हे जाणून घेण्यासाठी अवघा महाराष्ट्र आतुर आहे.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका अतिशय नाजूक विषयावर आधारलेली असून या मालिकेद्वारे लठ्ठपणाचा मुद्दा अत्यंत हळूवारपणे हाताळण्याचा प्रयत्न केला…स्त्री-पुरुष समानतेच्या आधुनिक काळातही मुलींच्या वाट्याला बाह्यरूपामुळे नकार येतो. या मालिकेमुळे लोकांचा सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला कुठेतरी हळूहळू सुरुवात होईल अशीच इच्छा आहे. आपल्या समाजातील वेगळं भावविश्व दाखवणारी, सुंदर असणं म्हणजे नक्की काय? याचा पुन्हाएकदा विचार कारायला भाग पाडणारी सुंदरा म्हणजेच लतिका महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये भरली, प्रेक्षकांनी मालिकेला उदंड प्रतिसाद दिला आणि अजूनही देत आहेत, आणि याचमुळे मालिकेला आज “वर्षपूर्ती” झाली.

मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी – लतिका, अभिमन्यू, इंदू, सज्जनराव, दौलत, बापू (लतिकाचे वडील), लतिकाची आई, मिस नाशिक, हेमा, आशुदादा संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली. मधुगंधा कुलकर्णी यांनी अतिशय सुंदररित्या कथेची मांडणी केली आहे. मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती मनवा नाईक यांच्या स्ट्रॉबेरी पिक्चर्सने केली आहे. मालिकेचे दिग्दर्शक, पडद्यामागची संपूर्ण टिम प्रचंड कष्टाने हे काम करते आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा !

मालिकेमध्ये आता नंदिनी नावाच्या पात्राची नुकतीच एंट्री झाली आहे ही भूमिका अदिति द्रविड साकारत आहे. तिच्या येण्याने मालिकेमध्ये पुढे काय होईल ? बापूंमुळे लतिका – अभिमन्यूची मैत्री अडचणीत आली आहे, पुढे काय होईल मालिकेत ? नंदिनीच्या येण्याने अभि आणि लतिका एकत्र येतील ? जाणून घेण्यासाठी बघा ‘सुंदरा मनामध्ये भरली’ सोम ते रवि रात्री ९.०० कलर्स मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.