मित्रांनी दिलेली कौतुकाची थाप प्रोत्साहन  देणारी : कुलगुरू प्रा.डाॅ.संजय सोनवणे 

मैत्र जीवाचे फाऊंडेशनच्या वतीने मान्यवरांचा सन्मान

0

नाशिक,दि,१३ एप्रिल २०२४ – मित्रपरिवाराने केलेल्या  सन्मान  सोहळ्यातून काम करणार्या व्यक्तींना निश्चितच प्रेरणा मिळते. आपल्या  कामाची दखल घेत  मित्रांनी  दिलेली कौतुक थाप    नवीन उमेदीने वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणारी ठरते असा विश्वास मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. संजय सोनवणे यांनी मैत्र जीवाचे फाऊंडेशन यांच्यावतीने  विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन  कुसुमाग्रज स्मारक विशाखा हाॅल येथे करण्यात आले होते याप्रसंगी व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी  मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. संजीव सोनवणे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठविधीज्ञ विलास लोणारी , ऍड जयंत जायभावे उपस्थित होते. यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.अजय निकम यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की हा सन्मान सोहळा मित्रांनी मित्रांच्या सन्मांनासठी आयोजित केला आहे. यावेळी त्यांनी मैत्र फाऊंडेशनच्यावतीने राबवण्यात येणार्या उपक्रमांचा आढावा त्यांनी घेतला.  स्पर्धा करा ,पण मैत्री जीवाभावाची ठेवा ..मित्र आणि आयुष्य एकदाच भेटते म्हणून मित्रांसह आयुष्य जगण्याचा आनंद वाढवला पाहिजे .

यावेळी सन्मानर्थी  सुनिल गवादे ,ललित बुब ,सचिन जोशी ,हेमंत  धात्रक  यांनी   मनोगत व्यक्त करत  सन्माबद्दल आभार मानले. त्याचप्रमाणे  विलास लोणारी आणि जयंत जायभावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मैत्र जीवाचे फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश भोरे ,उपाध्यक्ष अविनाश बोडके ,सचिव सुनिल बोरस्ते ,,सहसचिव हर्षल मटकर, कोषाध्यक्ष महेश महंकाळे , विश्वस्त  सदस्य सुनिल ठक्कर , सचिन कोळपकर ,प्रशांत कदम ,संतोष भोरे ,आविनाश आव्हाड  ,प्रविण कमळे,अनिकेत गाढवे ,सुनिल परदेशी ,समीर मांजरेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विनेंद्र लोणारी यांनी केले तर अविनाश आव्हाड यांनी आभार मानले.

यांचा झाला सन्मान 
हेमंत धात्रक -सरचिटणीस व्हिएन नाईक संस्था
सचिन   जोशी -संचालक इस्पिलिअर स्कूल
विलास शिंदे -चेअरमन  ,सह्याद्री फार्म
सुनील गवादे -अध्यक्ष, नरडेको
ललित बुब-  अध्यक्ष ,आयमा
रंजन ठाकरे -उपाध्यक्ष ,नाशिक मर्चंट को.ऑप.बॅक.लि.
राहुल शेवकरी -उत्तर महाराष्ट्र विक्री प्रमुख  पुना गाडगीळ अॅण्ड सन्स
देवेंद्र पटेल-सरचिटणीस ,श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी

या प्रसंगी ठक्कर उद्योग समूहाचे जितूभाई ठक्कर राम बंधू मसाल्याचे हेमंतजी राठी, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अँड. नितीनजी ठाकरे, गोखले एज्युकेशनचे श्री शैलेशजी गोसावी,सेवानिवृत्त पोलीस कमिशनर हरीषजी बैजल, एसीपी सोमनाथ तांबे संस्कृती वैभवचे अध्यक्ष नंदनजी दीक्षित, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुजाॅयजी गुप्ता,शंतनु देशपांडे मयूर कपोते,सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी राजेंद्रजी कलाल, पुणे विद्यार्थी गृहाचे सरचिटणीस अमोलजी जोशी मानवधन संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी कोल्हे,वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांतजी बेणी, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंदजी हिंगणे,विश्वस्त अँड.राजेंद्र ढोखळे, सल्लागार लोकेशजी शेवडे,सुप्रसिद्ध लेखक कैलास पाटील,नॅरडको युथ टीमचे अध्यक्ष पुरुषोत्तम देशपांडे बिल्डर बापूसाहेब बागड, सुनील हेकरे, शैलेश पटेल, तसेच तानाजीआप्पा जायभावे गुरमीतजी बग्गा ,अनिलजी चौघुले, यासारखे अनेक बांधकाम व्यवसाय तसेच आयमा चे पदाधिकारी राजेंद्र पानसरे, जगदीश पाटील, प्रमोद वाघ,सामाजिक संस्थेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर बोडके नाशिक वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड वैभव शेटे खजिनदार ॲड हेमंत गायकवाड, सहसचिव अँड संजय गीते समर्थ बँकेचे संचालक अँड जालिंदर ताडगे, डॉ रविकिरण निकम डॉ.निलेशजी कुंभारे, डॉ.देवेंन्द्र देशपांडे. ओंकार बिल्डर्स चे श्री राहुल पवार , रिटायर्ड ACPशांताराम अवसरे,आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!