मुंबई : बिग बॉस विजेता आणि सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला आहे. संपूर्ण मनोरंजन विश्वासाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे. त्याच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं आहे.
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याने झोपण्यापूर्वी काही औषधे घेतल्याचे वृत्त समोर येत आहे.औषध घेतल्या नंतर तो उठलाच नाही सिद्धार्थ चा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे असे रुग्णालया तर्फे सांगण्यात आले आहे.काल रात्रीपर्यंत सिद्धार्थ पूर्णपणे तंदुरुस्त होता. अशा परिस्थितीत, कोणताही आजार नसताना सिद्धार्थ शुक्लानं या जगाचा निरोप घेणं हे खूप धक्कादायक आहे.
सिद्धार्थ ‘बिग बॉस’ च्या 13 व्या सिझनचा विजेता ठरला होता.सिद्धार्थ शुक्ला मूळ मुंबईचाच होता.सिद्धार्थला मॉडेलिंग आणि अभिनयात बिलकुल रस नव्हता. सिद्धार्थला नेहमीच बिझनेस मधेच करियर करायचे होते. मात्र, त्याच्या लूक्समुळे अनेक जण त्याचं खूप कौतुक करायचे.२००४ मध्ये एकदा, आईच्या सांगण्यावरून, सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ तिथे पोहोचला होता. ज्युरीने सिद्धार्थचे लूक पाहून त्याची निवड केली होती. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती.
सिद्धार्थ शुक्लाची जवळची मैत्रीण शहनाज गिलनं त्याच्या मृत्यूच्या बातमीनंतर तिचं शूटिंग सोडलं आहे. शहनाज गिल सिद्धार्थच्या सर्वात जवळची होती. काही दिवसांपूर्वी दोघंही डान्स दिवानेमध्ये एकत्र रोमान्स करताना दिसले होते.