नाशिक – वाचनाने माणसाचे जीवन समृद्ध होते. साहित्यातून सुसंस्कृत समाज निर्माण होतो आणि वाचकांवर सुसंस्कार होत असतात. जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण यांना साहित्याच्या वाचनातून आनंद मिळेल आणि चार घटका आपल्या वेदना विसरता येतील असे काम ‘ ग्रंथ तुमच्या दारी ‘ या उपक्रमातून होणार आहे होईल, असा विश्वास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाची सुरुवात करताना व्यक्त केला.
ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमांतर्गत आज नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ग्रंथ पेटीचे हस्तांतरण करण्यात आले . या कार्यक्रमात डॉ अशोक थोरात हे बोलत होते. कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीवास्तव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी ग्रंथ पेटीचा स्वीकार केला. यावेळी ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाचे प्रमुख विनायक रानडे यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
ते म्हणाले , कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने जगभर पुस्तक पेटीचा उपक्रम राबविला जात आहे. वाचन संस्कृतीचा विकास व्हावा आणि माणसं जोडली जावी हा या उपक्रमाचा हेतू आहे. सुमारे सव्वादोन कोटी रुपयाची पुस्तके या उपक्रमांतर्गत जगभरात वाचकांपर्यंत पोहोचली आहेत. दिपक डोके फ्रेंड सर्कलच्या वतीने या ग्रंथ पेटीची संकल्पना जिल्हा रुग्णालयात राबविण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील रुग्णांबरोबरच येथील अधिकारी ,कर्मचारी यांना या पुस्तकांचा उपयोग होणार आहे. या समारंभास सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर, साहित्यिक प्रा शंकर बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम जाधव, आकाश सदावर्ते, दीपक गांगुर्डे , कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे रामदास जगताप यांच्यासह रुग्ण व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयात हा उपक्रम राबविल्याबद्दल दीपक डोके मित्रमंडळाचे अनेकांनी कौतुक केले.
अतिशय सुंदर छान उपक्रम आहे हा. ” ग्रंथ तुमच्या दारी ”
जागतिक मारामारी मुळे मरगळलेल्या मना ला उभारी देण्याचे काम चांगले ग्रंथ/पुस्तके करतील.
अश्या कार्याला जन् स्थान मुळे निश्चित गती मिळेल.
दोघांचे ही अभिनंदन.
अतिशय सुंदर छान उपक्रम आहे हा. ” ग्रंथ तुमच्या दारी ”
जागतिक मारामारी मुळे मरगळलेल्या मना ला उभारी देण्याचे काम चांगले ग्रंथ/पुस्तके करतील.
अश्या कार्याला जन् स्थान मुळे निश्चित गती मिळेल.
दोघांचे ही अभिनंदन.