Tata Tigor EV सिंगल चार्ज मध्ये धावणार 306 किमी

0

मुंबई – सणासुदीच्या दिवसांत आता टाटा मोटर्सने Tata Tigor इलेक्ट्रिक वर्जनला लॉन्च केले आहे.टाटा मोटर्सच्या अधिकृत संकेतस्थळानुसार भारतात टाटा टिगोरचे इलेक्ट्रिक वर्जन एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 306 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. ही कारची ARAI certified रेंज आहे.

नवीन टाटा टिगॉर ईव्ही फास्ट चार्जरद्वारे हि कार १ तासात ० ते ८० टक्के चार्ज करता येते. दुसरीकडे, नियमित चार्ज मध्ये म्हणजे होम चार्जिंग मध्ये ते सुमारे ८.५ तासांमध्ये ० ते ८० टक्के चार्ज होईल. ही कार १५A च्या सॉकेटने चार्ज केली जाऊ शकते. आणि हे चार्जर आपल्या घरात आणि कार्यालयात सहज उपलब्ध आहेत. टाटाच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये ५५ kW इलेक्ट्रिक मोटर आणि २६ kWh लिथियम आयन बॅटरी पॅक असेल, जे ७४ bhp (55kW) आणि १७० Nm पर्यंत टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. टाटा मोटर्स या कार वर ८ वर्षांची आणि १, लाख ६० हजार किमी पर्यंत बॅटरीची वॉरंटी देते आहे.

नवीन टाटा टिगोर ईव्हीमध्ये ग्राहकांना सर्वोत्तम सेफ्टी फीचर्स मिळणार आहेत. यात हिल एसेन्ट, हिल डिसेंट कंट्रोल, ड्युअल एअरबॅग्स, एबीएस विथ ईबीडी सीएससी अर्थात कॉर्नीरिंग स्टॅबिलिटी कंट्रोल अशी वैशिष्ट्ये मिळतील. याशिवाय, कार IP67 रेटेड बॅटरी पॅक आणि मोटरसह सुसज्ज असेल. टाटा मोटर्सचा दावा आहे की नवीन Tigor EV आता देशातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक सेडान असेल.

कंपनीच्या मते नवीन टाटा टिगोर ईव्ही तीन वेरिएंट मध्ये उपलब्ध असेल. यामध्ये टाटा टिगोर EV XE ची किंमत ११.९९ लाख रुपये, टाटा टिगोर EV XM ची किंमत १२.४९ लाख रुपये आणि टाटा टिगोर EV XZ+ ची किंमत १२.९९ लाख रूपये असेल. टाटा टिगोर ईव्ही:- अपडेटेड Tigor EV Ziptron तंत्रज्ञानासह येईल. Ziptrop तंत्रज्ञानावर आधारित Nexon EV नंतर टाटा मोटर्सची ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. २६ Kw लिथियम ऑईल बॅटरी पॅकसह सुसज्ज, ही इलेक्ट्रिक कार फक्त ५.७ सेकंदात ०.६० किमी प्रति तास वेग पकडेल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.