नाशिक मध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासॊबत हिट अँड रन :३ कर्मचारी गंभीर जखमी

0

नाशिक,दि, ८ जुलै २०२४ –मुंबईतील हिट अँड रन प्रकरण ताजे असतांनाच नाशिक मध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासॊबत हिट अँड रनची घटना घडली असून परराज्यातून अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या क्रेटा कारचा पाठलाग करताना हा अपघात घडला.

चांदवड तालुक्यातील हरनूल टोल नाक्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या कारचा सिनेस्टायिल पाठलाग सुरु असतांना या  कारने कट मारल्याने पथकाची स्कॉर्पिओ गाडी उलटली या अपघातात चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झाला तर पथकातील ३ कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या पथकात दोन पोलिसांचा समावेश असून जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घोटी ते नाशिक, नाशिक ते मनमाड, मनमाड ते चांदवड असा सव्वाशे किलोमीटरचा पथकाने सिनेस्टाईल क्रेटा कारचा पाठलाग केला. या दरम्यान अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या कारने पथकाच्या दोन कार उडवल्या असून त्यात एक सरकारी तर दुसरी खाजगी कार आहेत. घटना स्थळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक फौजफाट्यासह पोहचले असून अधिकचा तपास सुरु आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.