आजचे राशिभविष्य मंगळवार,२३ जुलै २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ कृष्ण द्वितीया. वर्षा ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज उत्तम दिवस आहे” 
नक्षत्र – धनिष्ठा/शततारका. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर/ (सकाळी ९.२० नंतर) कुंभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र अनुकूल आहे मात्र तरीही मोठी आणि महत्वाची कामे शक्यतो टाळा. नेहमीची कामे चालू ठेवा. कौटुंबिक कलह होऊ शकतो.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नोकरीच्या ठिकाणी काळजीपूर्वक काम करा. वृथा अहंकार नको. ग्राहकांची मर्जी संभाळावी लागेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नवम स्थानी चंद्र आहे. सांभाळून पावले टाका. प्रवासात त्रास होऊ शकतो. खर्च वाढतील. वाहन जपून चालवा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रतिकूल ग्रहमान आहे. अनुकूल मंगळ, हर्षल चा फारसा परिणाम मिळणार नाही. घरातील ज्येष्ठची काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी विनाकारण कटकटी होऊ शकतात. अधिकारी त्रास देतील. शक्यतो संयम बाळगा. लकवरच अडचणी दूर होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभ होतील. मात्र नियोजन काटेकोर करा. प्रवासात काळजी घ्या. गुपिते उघड करू नका.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नाराज मंगळ, हर्षल चा मोठा फटका बसू शकतो. प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचला. विनाकारण भलते धाडस नको.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शत्रू शिरजोर होतील. कोर्ट कामात मनासारखे निकाल लागणार नाहीत. घरगुती कामे करावी लागतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  उधारी वसूल होईल. स्थावर संपत्ती वाढेल. नात्यातून लाभ होतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच राशीत सकाळी चंद्र आहे. प्रिय व्यक्तीची काळजी वाटेल. संततीची काळजी घ्या. प्रेमात नुकसान संभवते.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सकाळी १०.०० नंतर अनुकूलता वाढेल. मात्र फारसा आशादायक दिवस नाही. घरगुती कलह होऊ शकतो. हरवलेली वस्तू सापडेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सकाळी अनुकूल ग्रहमान आहे. कामे पूर्ण करा. वाहन सांभाळून चालवा. लेखकांनी काळजी घ्यावी.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.