‘बिग बॉस मराठी’च्या घरात पार पडणार पहिलं नॉमिनेशन कार्य :’हे’सदस्य झालेत नॉमिनेट

0

मुंबई,दि,३१ जुलै २०२४ – ‘बिग बॉस मराठी’आणि टास्क हे एक समीकरणच आहे. स्पर्धकांना घरात टिकून राहण्यासाठी हुशारीने टास्क खेळावेच लागतात. प्रीमियर पासून ‘बिग बॉस’ स्पर्धकांना पेचात पाडत आहेत.’बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचं सर्वत्र कौतुक होत असून घरातील सदस्यांचे भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती ‘बिग बॉस’प्रेमींच्या पसंतीस उतरत आहेत.’बिग बॉस मराठी’ सुरू होऊन चार दिवस पूर्ण झाले असून चौथ्या दिवशीच घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये आज नॉमिनेशन कार्याचा शुभारंभ होणार आहे. याबाबतचा प्रोमोदेखील आऊट झाला आहे.’नॉमिनेशनची तोफ’असं या पहिल्या नॉमिनेशन कार्याचं नाव आहे. प्रतिस्पर्ध्याला घराबाहेर काढण्यासाठी ‘बिग बॉस’ने ‘नॉमिनेशन तोफ’या कार्याचा अवलंब केला आहे.पहिल्याच कार्यादरम्यान ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे.

टास्कसाठी भिडताना अंकिता आणि निक्कीमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाचीदेखील झालेली पाहायला मिळेल.राड्यादरम्यान या दोन सदस्य टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य सेफ होणार आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. एक घर, 100 दिवस आणि 16 स्पर्धकांचा प्रवास आता सुरू झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातलं पहिलं मोठं भांडण; निक्की आणि आर्यामध्ये शाब्दिक चकमक
बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचं सर्वत्र कौतुक होत आहे. घरातील सदस्य एकमेकांची काळजी घेण्यासोबत राडेदेखील करत आहेत. आज एकीकडे घरात ‘नॉमिनेशनची तोफ’ हे पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. पहिल्याच टास्क दरम्यान घरातील सदस्यांमध्ये मोठं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होणार आहे. तसेच आर्याने अरबाजला आणि वैभव चव्हाणलादेखील फटकारलं आहे.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आणि आर्या जाधव एकमेकांसोबत मोठमोठ्याने भांडताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये आर्याला निक्कीचा चांगलाच राग आलेला दिसून येत आहे. आर्या निक्कीला “तुला घाबरायला पाहिजे”,म्हणत धमकी देताना दिसत आहे. तर निक्की तिला “फट्टू” म्हणते. त्यावर निक्की तिला “वेडी” म्हणते. आर्या पुढे म्हणते,”मला शांत करायचं नाही”. आर्या आणि निक्कीचा राग अनावर झाला आहे. त्यामुळे नॉमिनेशन टास्क दरम्यान आणखी रंगत येणार आहे.
‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात वर्षा उसगांवकर,योगिता चव्हाण,अंकिता प्रभू-वालावलकर,सूरज चव्हाण आणि कोल्हापूरच्या पुरुषोत्तमदादा पाटील या सदस्यांचा समावेश आहे.आता या सहा सदस्यांमधून कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे पाहावे लागेल.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.