आजचे राशिभविष्य बुधवार,१४ ऑगस्ट २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण शुक्ल तृतीया.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे”
नक्षत्र – अनुराधा/ज्येष्ठ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शुक्र आणि शनिशी केंद्र योग फारशी अनुकूलता नाही. सांभाळून पावले टाका. मोठे करार आज नकोत. तब्येतीची काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सामाजिक कार्य करताना भेदभाव करू नका. विनाकारण प्रसिद्धीच्या मागे लागू नका. शत्रू वाढवून घेऊ नका.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ आजही होतच आहेत. मात्र मोठी जोखीम नको. मौल्यवान वस्तू सांभाळा. प्रवासात त्रास संभवतो.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमचा मूळ स्वभाव साधा आणि प्रेमळ आहे. त्यास अनुसरून व्यवहार करा. फारसे धाडसी निर्णय घेऊ नका. बोलताना काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आज प्राणयरम्य दिवस आहे. भेटवस्तू मिळतील. महिलांना आनंद देणाऱ्या बातम्या समजतील. घरगुती कामे पूर्ण होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक दृष्टीने चांगला दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. नवीन खरेदी होईल. आरोग्य सांभाळा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज मंजूर होईल. पैशांची व्यवस्था होईल. प्रवास कार्यसाधक होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नोकरीच्या ठिकाणी सावध भूमिका घ्या. महिलांशी वागताना काळजी घ्या. जमीन व्यवहारात नुकसान होऊ शकते.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अजूनही फारशी अनुकूलता नाही. एखादी मौल्यवान भेटवस्तू मिळू शकेल. वाहन सुख लाभेल मात्र प्रवासाचे नियोजन बदलेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. मन आनंदी राहील. कष्टाचे उत्तम फळ मिळेल. स्त्री धन वाढेल. कौटुंबिक पेच सोडवावे लागतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) काम काजात सुधारणा होईल. व्यवसाय वाढेल. मात्र काही निमित्ताने घरात अधिक वेळ व्यतीत करावा लागेल. पत्नीची काळजी घ्या.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नववा चंद्र काही सुखद घटना अनुभवास देईन. आर्थिक बळ वाढेल. मन अस्वस्थ राहील. खरेदी होईल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!