आजचे राशिभविष्य शुक्रवार,१६ ऑगस्ट २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण शुक्ल एकादशी. क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज सकाळी १०.०० नंतर चांगला दिवस आहे.*पुत्रदा एकादशी,वरद लक्ष्मी व्रत*
चंद्र नक्षत्र – मूळ.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज मेहनत घेतल्यास लक्ष्मी प्रसन्न होईल. भौतिक सुखे प्राप्त होतील. मौल्यवान खरेदी होईल. अनुकूल शनी मोठी झेप घेण्यास साहाय्य करेन.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. सुखद अनुभव येतील. आर्थिक लाभ होतील मात्र मार्ग चुकू देऊ नका. अन्यथा नंतर संकट याल. नोकरीत अधिकार
वाढतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) लेखणीला जोर येईल. कलाकारांना चांगला दिवस आहे. इष्ट देवता प्रसन्न राहतील. एखादा दागिना मिळू शकतो.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक प्रगती जोमाने होणार आहे. वेळेचे भान ठेवून काम करावे लागेल. कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. परंपरा जोपासल्या जातील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. शेअर्स मधून लाभ होतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. विवाह इच्छुकांचे विवाह
जुळतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) नेहमीपेक्षा वेगळ्या कामासाठी वेळ राखून ठेवावा लागेल. नियोजन बदलेल. नवीन ओळखी होतील. वाहन सुख लाभेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक उलाढाल वाढेल. प्रगतीचा वेग समाधानकारक राहील. प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्याल. सुखद अनुभव येतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सर्वार्थाने अनुकूल ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. श्री शिव आराधना लाभदायक ठरेल. राजकारणापासून दूर रहा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमच्या राशीतील चंद्राचा शुक्र आणि शनीशी शुभ योग आहे. ग्रहमान प्रसन्न आहे. दूरचे प्रवास संभवतात. भौतिक सुखे लाभतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रिय व्यक्तीची साथ मिळेल.अष्टपैलू गुण दर्शन कराल. स्तुतीचा लाभ होईल. तुमचा सल्ला मोलाचा ठरेल.कोणाचे मन दुखवू नका

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम ग्रहमान आहे. सर्वार्थाने प्रगती साधणार दिवस आहे. पत्नीची साथ मोलाची ठरेल. आवडत्या व्यक्तीची भेट होईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नोकरी/व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. बराच काळ ज्याची वाट बघत होतात ती घटना घडेल. नवीन संधी प्राप्त होतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!