सिंगल चार्जमध्ये ४०० किलोमीटरची जबरदस्त रेंज देणारी इलेक्ट्रिक कार भारतात होणार लॉन्च

0

मुंबई – भारतात इलेक्ट्रीक कारचे पर्याय आता उपलब्ध होऊ लागले आहेत.नव्या नव्या कंपन्या लवकरच या क्षेत्रात प्रवेश करता आहेत. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून या कार कडे आता नागरिकांचा कल वाढला असून प्रदूषण मुक्त असल्येल्या या गाडयांना आता मागणी वाढते आहे.

इलेक्ट्रीक गाड्यांमध्ये Hyundai ची Kona Electric एसयूवी, MG ची ZD ईवी, Tata Motors ची Nexon Electric गाड्यांचा पर्याय आहे. याशिवाय लवकरच मार्केटमध्ये Mahindraची इलेक्ट्रीक एसयूवीज येणार आहे. पेट्रोल डिझेल एसयूवीजबाबत बोलायचं झालं तर महिंद्राच्या गाड्यांना चांगली मागणी आहे.

Mahindra eXUV300

Mahindra eXUV300 कंपनीची लोकप्रिय आणि सुरक्षित एसयूवी XUV300 वर आधारित आहे. कंपनीने या एसयूवीचं यश पाहता इलेक्ट्रीक सेगमेंटमध्ये eXUV300 भारतीय मार्केटमध्ये आणण्याची योजना बनवली आहे. ऑटो एक्सपो २०२० मध्ये देखील ती सादर करण्यात आली होती. ही एक स्टाइलिश इलेक्ट्रिक एसयूवी असणार आहे. जी सिंगल चार्जमध्ये ३७५ ते ४०० किलोमीटर पर्यंत धावणार आहे. eXUV300 कंपनीची पॉपुलर सब-कॉम्पॅक्ट एसयूवीचा हा इलेक्ट्रिक अवतार असणार आहे. Mahindra eXUV300 डिझाइनच्या बाबतीत XUV300 सारखीच आहे. पण काही मोठे अपडेट्स त्यामध्ये असतील.

Mahindra eKUV100

Mahindra eKUV100 मध्ये 15.9 किलोवॅट लिक्विड कूल मोटर लावण्यात आली आहे. जी 54Ps पावर 120NM टॉर्क जनरेट करणार आहे. चांगल्या बॅटरीमुळे एसयूवी जवळपास १४७ किमी देण्यात सक्षम आहे. या कारमध्ये फास्ट चार्जिंग फीचर ही देण्यात आला आहे. ज्यामुळे ८० टक्के चार्जिंग होण्यासाठी ५० मिनिटे लागणार आहेत. या कारची किंमत ८ ते ९ लाखांच्या घरात असू शकते असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. .

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.