राज्यात पावसाचा जोर वाढणार : नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

0

मुंबई – उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात येत्या ४८ तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे येत्या ४ ते ५ दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटा सहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर येथेही पुढील आठवड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रविवार ते मंगळवार पर्यंत, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रविवार ते बुधवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर रायगडमध्ये सोमवार ते बुधवार या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या काळात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी अतीतीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मुंबई, ठाणे येथे काही ठिकाणी मंगळवारी अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

६ सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना तर ७ सप्टेंबरला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, ८ सप्टेंबरला पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टी लगतच्या मासेमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.