आजचे राशिभविष्य रविवार,१५ सप्टेंबर २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद शुक्ल द्वादशी/त्रयोदशी. शरद ऋतू.  क्रोधीनाम संवत्सर.  
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज उत्तम दिवस आहे”*प्रदोष, वामन जयंती* 
चंद्र नक्षत्र – श्रवण. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर. (अतिगंड शांती करून घ्यावी)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521).

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरू आणि शुक्राशी शुभ योग आहे. कामाच्या ठिकाणी उत्तम सहकार्य लाभेल. महिलांकडून लाभ होतील. परदेश प्रवासात नियोजन बदलेल.

वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. दूरचे प्रवास संभवतात. वाहन सौख्य लाभेल. सामाजिक कार्य करतांना सीमा ओलांडू नका.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अष्टम स्थानी चंद्र आहे. दानधर्म करण्यास उत्तम कालावधी आहे. सिद्धी प्राप्त होतील. कलाकारांना लाभ होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सप्तम चंद्र व्यवसायासाठी चांगला आहे. यश मिळेल. महिलांना दागिने मिळतील. जोडीदार खुश राहील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रगती कारक दिवस आहे. व्यवसाय वाढेल. व्यापारात लाभ होतील. अहंकार टाळला पाहिजे.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) पंचम चंद्र स्वप्ने साकार करेल. प्रणयरम्य दिवस आहे. आनंदात व्यतीत कराल. संतती कडून शुभ समाचार समजतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभ होतील. गृह सजावट कराल. नवीन खरेदी होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  आर्थिक लाभ होतील. दबदबा वाढेल. अनुकूल शुक्र भौतिक सुखे प्रदान करेन. जोडीदाराचा सल्ला मानणे हिताचे आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  कौटुंबिक सुख लाभेल. धार्मिक कामासाठी खर्च कराल. नोकरीच्या ठिकाणि भिन्न लिंगी व्यक्तीकडून उत्तम सहकार्य लाभेल.कुलदेवतेची उपासना करा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच राशीत चंद्र आहे. गुरू आणि शुक्र त्रिकोण योगात आहेत. उत्तम कालावधी आहे. संधीचे सोने करा. प्रवास कार्यसाधक होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यय स्थानी चंद्र आहे. काही सुखद अनुभव येतील. स्वतःच्या चैनीसाठी खर्च कराल. घरगुती कामासाठी वेळ द्याल. शत्रू शिरजोर होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चंद्र अनुकूल आहे. मनासारखे कामे पार पडतील. स्वप्ने साकार होतील. हाती घेतलेले काम यशस्वी होईल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.