आजचे राशिभविष्य शनिवार २ नोव्हेंबर २०२४ 

0

कार्तिक शुक्ल प्रतिपदा. शरद ऋतू.
राहुकाळ – दुपारी ४.३४ ते सायंकाळी ५.५९ 
“आज शुभ दिवस आहे.”दिवाळी पाडवा,बलिप्रतिपदा,
नक्षत्र – विशाखा 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) महिलांकडून लाभ होतील. वाहन सौख्य लाभेल. मोठी खरेदी होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) स्पर्धेत यश मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. शत्रू पराभूत होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यवसायात उत्तम नफा होईल. दळणवळण व्यवसायातून लाभ होतील.मात्र प्रवासात काही अडचणींचा देखील सामना करावा लागेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कलाप्रांतात उत्तम कामगिरी कराल. लेखकांना यश मिळेल. दागिने घडतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) शेती कामातून किंवा जमीन विक्रीतून लाभ होतील. गायकांना चांगला दिवस आहे. पत्नीशी मतभेद संभवतात.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  आर्थिक बाजू भक्कम होईल. व्यवसायात भरभराट होईल. लेखकांना चांगला दिवस आहे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) बौद्धिक संपदा कामी येईल. सखोल संशोधन करण्याचा तुमचा स्वभाव असल्याने नवीन संधी प्राप्त होतील.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मेजवानी चे आयोजन कराल. बौद्धिक खुराक मिळेल. सणाचा आनंद घ्याल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) ग्रहमान फारसे अनुकूल नाही. भ्रमंती होईल. नवीन खरेदी कराल. व्यक्त होताना काळजी घ्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत उत्तम दिवस आहे. लाभतील चंद्र – बुध युती भरभराट देतील. भौतिक सुखे लाभतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यवसाय वृद्धी साठी उत्तम दिवस आहे. कष्टाचे चीज होईल. स्त्रीधन वाढेल. दूरच्या प्रवासात त्रास संभवतो.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रणयरम्य दिवस आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आनंदी राहाल. पर्यटन कराल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!