पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक 

0

नवी दिल्ली,दि,१४ एप्रिल २०२५ –पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) कर्ज घोटाळ्याप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. या घोटाळा प्रकरणी फरार असलेला आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियममधील पोलिसांकडून अटक करण्यात आली असल्याचे वृत्त समोर आले आहे.भारतीय यंत्रणांच्या विनंतीवरुन बेल्जियम पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या १३,५०० कोटींच्या कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चौक्शीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विनंतीवरून ६५ वर्षीय मेहुल चोक्सीला शनिवारी अटक करण्यात आली आणि तो सध्या तुरुंगात आहे, असे इकॉनॉमिक टाईम्सने वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार , मेहूल चौक्शीकडे एके  काळी अफाट म्हणजेच २० हजार कोटींपेक्षा जास्त संपत्ती होती. मेहुल चोक्सीच्या नेतृत्वाखाली त्याच्या कंपन्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढला. त्यांनी जेव्हा कंपनीचा कार्यभार स्वीकारला तेव्हा तिची उलाढाल ५० कोटी रुपये होती. चोक्सीने त्याचा विस्तार जगभरातील देशांमध्ये केला. २००६ मध्ये गीतांजलीने सॅम्युअल ज्वेलर्स यूएस कंपनीसोबत करार केला. अमेरिकेतील १११ मोठ्या स्टोअर्समध्ये त्याने आपले स्थान निर्माण केले होते.

पोलिसांनी चोक्सीला अटक करताना मुंबई न्यायालयाने जारी केलेल्या दोन ओपन-एंडेड अटक वॉरंटचा संदर्भ दिला.ही वॉरंट २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजीची होती,असे वृत्तात म्हटले आहे.मात्र, आरोपी चोक्सी प्रकृती अस्वास्थ्य आणि इतर कारणांमुळे जामीन आणि तात्काळ सुटकेची मागणी करेल असे म्हटले जात आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!