📍 बेंगळुरू, दि. ४ जून २०२५-RCB Victory Parade Accident आरसीबी ने आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावल्याचा जल्लोष बेंगळुरूमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच एक मोठा अपघात घडला. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या विजय परेडदरम्यान भगदड झाली आणि या दुर्घटनेत १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर २० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत.
👥 जखमींमध्ये काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती असून, मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
❓ कशी झाली ही चेंगरा चेंगरी ?(RCB Victory Parade Accident)
आरसीबीच्या विजय परेडसाठी हजारो चाहत्यांनी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. परेड संध्याकाळी ५ वाजता सुरू होण्याची होती, मात्र खेळाडू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेण्यासाठी विधानसभेत गेले होते. त्यामुळे परेड उशिरा सुरू होणार होती.
#WATCH | Bengaluru, Karnataka | A large number of #RoyalChallengersBengaluru fans have turned up to catch a glimpse of their champion team at the M Chinnaswamy Stadium.
A special felicitation ceremony for all RCB players has been organised by the Karnataka State Cricket… pic.twitter.com/Kj8L3FB9Ii
— ANI (@ANI) June 4, 2025
🪖 याचदरम्यान, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे, आणि यामुळेच अचानक भगदड उडाली.
💔 विजयाचं जश्न…मातमात बदललं
आरसीबीने प्रथमच आयपीएल विजेतेपद मिळवलं. अंतिम सामन्यात त्यांनी पंजाब किंग्जला ६ धावांनी पराभूत केलं. कर्नाटकभर आरसीबीच्या विजयाचा जल्लोष सुरू होता. पण या अपघाताने संपूर्ण वातावरण शोकांतिका बनवलं आहे.
👉 ह्या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत:
गर्दीवर लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला?
पोलीस यंत्रणा अपयशी ठरली का?
आयोजनातील अडथळे टाळता आले असते का?
📢 सध्या पोलीस तपास सुरू असून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.
#WATCH | A car was
damaged after fans climbed over it outside the M Chinnaswamy Stadium in Bengaluru
A large number of #RoyalChallengersBengaluru fans have turned up here to catch a glimpse of their champion team.
A special felicitation ceremony for all RCB players has been… pic.twitter.com/WuNrbo5Bzh
— ANI (@ANI) June 4, 2025