“तेहरानला जाळून टाकू”—इस्रायलकडून इराणला थेट इशारा!

२०० क्षेपणास्त्रां हल्ल्या नंतर इस्रायलचा स्फोटक इशारा —युद्ध आता निर्णायक टप्प्यावर

1

जेरुसलेम/तेहरान (१४ जून २०२५):Israel Iran latest update-मध्य पूर्वेत पुन्हा एकदा भीषण तणाव निर्माण झाला आहे. इराणकडून इस्रायलवर सुरू असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलचे संरक्षण मंत्री इजरायल काट्ज यांनी थेट इशारा दिला आहे की,”जर इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले थांबवले नाहीत, तर तेहरानला आम्ही जाळून टाकू.”

🔥 काय म्हणाले काट्ज?
इस्रायली संरक्षण मंत्री काट्ज यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत इराणवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले, “इराणचे हुकूमशहा स्वतःच्या नागरिकांना युद्धात बळी ठरत आहेत. जर खामेनेई इस्रायली नागरिकांवर मिसाईल हल्ले करत राहिले, तर आम्ही तेहरान पेटवू.”

🛰️ युद्धाचा आढावा:(Israel Iran latest update)
इराणने २०० क्षेपणास्त्रं आणि १०० हून अधिक ड्रोन इस्रायलकडे डागले.
इस्रायली एअर डिफेन्स सिस्टम ने बहुतेक क्षेपणास्त्रं नष्ट केली, परंतु काही मिसाईल रहिवासी भागात कोसळल्या.
३ नागरिकांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी
तेल अवीव, रमात गन आणि रिशोन लेजिओन मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान

🛩️ इस्रायलची उत्तर कारवाई:
इस्रायलने इराणमधील हवाई संरक्षण यंत्रणांवर थेट हल्ले करून आपल्या लढाऊ विमानांना तेहरानमध्ये सहज प्रवेश मिळवून दिला आहे.
IDF प्रमुख एयाल जामीर आणि वायुसेना प्रमुख टॉमर बार यांनी सांगितले की, “प्रथमच इस्रायली विमाने १५०० किमी अंतर पार करत थेट तेहरानवर हल्ला करण्यास सक्षम झाली आहेत.”

टॉमर बार यांनी सांगितले की, “आम्ही एका दिवसात शेकडो लक्ष्यांवर हल्ला केला असून यामध्ये डझनभर विमानविरोधी प्रणालींचा समावेश होता. हा हल्ला धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे.”

🌍 दोन्ही देश आता युद्धाच्या उंबरठ्यावर?
या हिंसक देवाणघेवाणीमुळे जगभरात चिंता वाढली आहे. दोन्ही देशांच्या कारवाईवर नजर ठेवली जात आहे कारण परिस्थिती आण्विक पातळीपर्यंत पोहचण्याचा धोका निर्माण झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिका या संघर्षात मध्यस्थी करतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] मशहद विमानतळावर हवाई हल्ला करत इंधन भरणाऱ्या विमानाला लक्ष्य केल्याने […]

Don`t copy text!