आजचे राशीभविष्य – बुधवार, १८ जून २०२५

१८ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya Today)
विशेष : “काळाष्टमी” – आजचा दिवस सकारात्मक आहे.
📅 ज्येष्ठ कृष्ण सप्तमी/अष्टमी | शके १९४७ | संवत २०८१ | वर्षा ऋतू
🕛 राहुकाळ : दुपारी १२.०० ते १.३०
🌌 नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी : कुंभ (संध्याकाळी ६.३५ नंतर – मीन)

(Marathi Rashi Bhavishya Today)

🔥 मेष (ARIES)
शुभ रंग : लाल | शुभ अंक : ३
चंद्र-हर्षल योगामुळे माफक यश. आत्मसंतोष मिळेल. खर्चाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या.
👉 टिप : सरकारी नियम पाळा आणि धाडस टाळा.

💚 वृषभ (TAURUS)
शुभ रंग : हिरवा | शुभ अंक : ६
मन प्रसन्न राहील. घरातील प्रतिष्ठा वाढवण्याची संधी. अचानक धनलाभ संभवतो.
👉 टिप : कटू प्रसंग टाळण्यासाठी संयम ठेवा.

🧠 मिथुन (GEMINI)
शुभ रंग : पिवळा | शुभ अंक : ५
उत्साही वाटेल पण खर्चावर नियंत्रण आवश्यक. कायदेशीर अडथळे संभवतात.
👉 टिप : संभाषणात स्पष्टता ठेवा.

🌊 कर्क (CANCER)
शुभ रंग : पांढरा | शुभ अंक : २
दिवस मिश्र आहे. दुपारनंतर ग्रहमान अनुकूल. अचानक लाभाची शक्यता.
👉 टिप : कोणतीही मोठी जोखीम टाळा.

🦁 सिंह (LEO)
शुभ रंग : सोनेरी | शुभ अंक : १
नोकरीत उत्तम दिवस. खर्चही होणार पण सामाजिक मान वाढेल.
👉 टिप : वाद-विवाद टाळा.

🌾 कन्या (VIRGO)
शुभ रंग : निळा | शुभ अंक : ४
नवीन खरेदी होईल. आर्थिक स्थैर्य दिसून येईल. संयम ठेवणे गरजेचे.
👉 टिप : गुंतवणूक करताना घरच्यांचा सल्ला घ्या.

⚖️ तुळ (LIBRA)
शुभ रंग : गुलाबी | शुभ अंक : ७
आरोग्य लाभेल. घरातील वरिष्ठ व्यक्तींशी जवळीक वाढेल. अभ्यासात यश.
👉 टिप : कठोर परिश्रम हाच यशाचा मंत्र.

🦂 वृश्चिक (SCORPIO)
शुभ रंग : नारिंगी | शुभ अंक : ९
शेअर व्यवहारात जपून पावलं टाका. आर्थिक नुकसानाची शक्यता.
👉 टिप : उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या.

🏹 धनु (SAGITTARIUS)
शुभ रंग : पिवळसर | शुभ अंक : ३
शेती व जमीन व्यवहारात लाभ. अडथळे दूर होतील.
👉 टिप : भागीदारी टाळा, वैयक्तिक आरोग्य लक्षात घ्या.

🪨 मकर (CAPRICORN)
शुभ रंग : राखाडी | शुभ अंक : ८
आध्यात्मिक आणि आर्थिक लाभ दोन्ही संभवतात. वरिष्ठांची सेवा करा.
👉 टिप : सरकारी कामात संयम ठेवा.

🌪 कुंभ (AQUARIUS)
शुभ रंग : फिकट निळा | शुभ अंक : ७
कौटुंबिक सौख्य लाभेल. दीर्घकालीन निर्णय योग्य ठरतील.
👉 टिप : संततीशी सुसंवाद ठेवा. आरोग्यकडे लक्ष द्या.

🌊 मीन (PISCES)
शुभ रंग : जांभळा | शुभ अंक : २
चंद्र राशीत आल्याने आत्मविश्वास वाढेल. कलाकारांना विशेष लाभ.
👉 टिप : शत्रूंचा त्रास कमी होईल, सतर्क राहा.

१८ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर मंगळ, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही सभ्य आणि मोठ्या मनाचे आहात. सुदृढ आहात. विकारांवर ताबा ठेवला पाहिजे. वक्तृत्व, हरहुन्नरीपणा ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. मोठपणा आणि मान सन्मान यांस तुम्ही अधिक महत्व देतात. इतरांना शिकवणे, स्वतः अभ्यास करणे तुम्हाला आवडते. वडिलोपार्जित संपत्ती मिळते. वैवाहिक जीवनातील समस्यांचा दबाव घेऊ नका. कारण तुम्ही आक्रमक, धाडसी, तडफदार आणि लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात आणि तुमच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला पुर्ण विश्वास आहे. तुम्हाला आयुष्यात मोठा अधिकार आणि मानसन्मान मिळतात. तुम्हाला शक्तिशाली खेळांची आणि व्यायामाची आवड आहे. इतरांवर तुम्ही दया करतात मात्र त्यातून तुम्हाला एक प्रकारचा आनंद मिळतो.

आजारी लोकांना तुम्ही स्वतःचे क्षमतेने बरे करू शकतात. तुम्ही शीघ्रकोपी आहात मात्र स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकतात. बौद्धिक क्षेत्रात काम करणे तुम्हाला आवडते. तुमचे विचार ठाम आहेत. तुम्हाला तुमची मुले आणि बहिणी जास्त प्रिय असतात. तुम्ही कायदा प्रेमी आहात. जबाबदारीच्या जागांवर तुम्ही काम करू शकतात. तुमची मनाची शक्ती अफाट असून तुम्हाला गूढ अनुभव येतात. तुम्हाला प्रवासातून अनेक अनुभव येतात आणि त्यामुळे तुमचे जीवन परिपक्व होते. तुम्ही अभ्यासू वृत्तीचे आहात. इतरांच्या पेक्षा तुमचे विचार पुढे असतात. तुम्ही तुमच्या मतांशी ठाम असतात. विनाकारण इतरांची खोडी काढणे तुम्ही टाळले पाहिजे. आयुष्यात अहंकार आणि पोकळ दिमाख याला काही अर्थ नाही. तुम्ही बोलण्यामध्ये आणि वक्तृत्वात प्रवीण आहात. स्वतःची चूक तुम्ही कधीही मान्य करत नाहीत. इतरांवर टीका करणे टाळल्यास तुम्ही अधिक प्रगती करू शकाल.

व्यवसाय:- हॉटेल व्यवस्थापन, संगीतकार, दाग-दागिने विक्री, बेकरी, गृहसजावट, पोलीस, मिल्ट्री, डॉक्टर, केमिस्ट, लोखंड, बांधकाम क्षेत्र, इंजिनिअर.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- तांबडा, पांढरा, पिवळा.
शुभ रत्न:- पाचू, पुष्कराज, मोती माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

📞 व्यक्तिगत कुंडली विश्लेषण व मार्गदर्शनासाठी संपर्क करा
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
(आपल्या स्वभाव, आरोग्य, करिअर, विवाह, संतान व भाग्योदय याबद्दल तपशीलवार मार्गदर्शन उपलब्ध)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!