
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
कार्तिक कृष्ण प्रतिपदा.विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
चंद्र – वृषभ राशीतून मिथुन राशीकडे संक्रमण
नक्षत्र – कृत्तिका.
राहुकाळ – दुपारी १.३० ते ३.०० (Marathi Rashi Bhavishya)
मेष: आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस. सोने-चांदी, वाहन किंवा स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीसाठी शुभ काळ. घरात आनंदाचे वातावरण.
वृषभ: चंद्र तुमच्या राशीत असल्याने तेज आणि आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये यश, नव्या योजना यशस्वी. दान आणि पूजा शुभ.
मिथुन: खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या. संध्याकाळनंतर आर्थिक परिस्थितीत सुधारणा. ध्यान किंवा जप उपयुक्त ठरेल.
कर्क: नवे मित्र लाभदायक ठरतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान. व्यवसायात प्रगती. संध्याकाळी शुभ वार्ता मिळेल.
सिंह: वरिष्ठांकडून प्रशंसा. कार्यक्षेत्रात वाढती प्रतिष्ठा. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल काळ. दैव तुमच्या बाजूने आहे.
कन्या: भाग्यवृद्धीचा दिवस. प्रवास, नवे शिक्षण किंवा प्रशिक्षणासाठी योग्य काळ. आध्यात्मिकतेत रुची वाढेल.
तूळ: आर्थिक लाभाची शक्यता. जुनी अडचण सुटेल. मात्र भावनिक निर्णय टाळा. संध्याकाळी मनःशांती लाभेल.
वृश्चिक: दांपत्य जीवनात आनंद वाढेल. भागीदारीतून लाभ. नवीन करार यशस्वी ठरतील. सामाजिक वर्तुळात प्रतिष्ठा वाढेल.
धनु: कामाचा व्याप वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. दैनंदिन कामकाजात सातत्य ठेवा. संध्याकाळी विश्रांतीचा योग.
मकर: विद्यार्थ्यांना व प्रेमसंबंधांना अनुकूल काळ. नवे संधीचे दार उघडेल. आर्थिक लाभ मिळू शकतो.
कुंभ: घरात शुभ कार्याचे योग. स्थावर मालमत्तेविषयी शुभ बातमी. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मीन: प्रवास योग उत्तम. संवाद आणि लेखनासाठी शुभ काळ. मित्रांचा आधार लाभेल. आत्मविश्वास वाढेल.
आजचा शुभ रंग: सुवर्ण (सोन्याचा)
आजचा मंत्र: “ॐ धनदाय नमः”
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)



