prsanna

राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर : नाशिक केंद्रातून ‘काळाच्या पंजातून’ला प्रथम क्रमांक

0

मुंबई, दि. ४ डिसेंबर २०२५ Nashik Drama Results ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून विजय नाट्य मंडळ, नाशिक निर्मित ‘काळाच्या पंजातून’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला असून, परिवर्तन बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांचे ‘कूच कूच’ नाटक द्वितीय आणि लोकहितवादी मंडळाचे ‘प्रतिषिद्ध’ नाटक तृतीय पारितोषिक विजेते ठरले. सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी हे निकाल प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. या तिन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड देखील झाली आहे.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जल्लोषात पार पडलेल्या स्पर्धेत एकूण २५ नाट्यप्रयोग सादर झाले. परीक्षक म्हणून श्री. सुधाकर पाटील, श्री. रविंद्र नंदाने आणि सौ. शोभना मयेकर यांनी परीक्षकाची भूमिका बजावली.

🎭 प्रमुख विभागनिहाय पारितोषिके(Nashik Drama Results)

दिग्दर्शन

प्रथम : वरुण भोईर काळाच्या पंजातून

द्वितीय : नुतन गोरे-पगारे कूच कूच

तृतीय : मुकेश काळे प्रतिषिद्ध

💡 प्रकाश योजना

प्रथम : कृतार्थ कंसारा काळाच्या पंज्यातून

द्वितीय : रविंद्र रहाणे कूच कूच

तृतीय : विनोद राठोड नेबर, प्लंबर आणि ती

🎨 नेपथ्य

प्रथम : किरण भोईर काळाच्या पंजातून

द्वितीय : आदित्य समेळ प्रतिषिद्ध

तृतीय : स्वरूप बागुल गंमत असते नात्यांची

💄 रंगभूषा

प्रथम : दत्ताजी जाधव काळाच्या पंजातून

द्वितीय : माणिक कानडे कूच कूच

तृतीय : तितिक्षा मोरे नेबर, प्लंबर आणि ती

🎼 संगीत दिग्दर्शन

प्रथम : आनंद अत्रे तुका vs नामा

द्वितीय : प्रथमेश पाडवी प्रतिषिद्ध

तृतीय : भूषण भावसार शिनेमा

👗 वेशभूषा

प्रथम : संजय जरीवाला काळाच्या पंज्यातून

द्वितीय : कृष्णा शिंदे कूच कूच

तृतीय : सुरेखा लहानगे मिशन २१

🏅 उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक

अमोल थोरात काळाच्या पंजातून

मानसी मारु नेबर, प्लंबर आणि ती

🎖 अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रे

सृष्टी शिरवाडकर, भावना कुलकर्णी, तनिषा जाधव, सायली बोंडगे, रेवती अय्यर, भगवान निकम, सागर संत, रोहित पगारे, भरत कुलकर्णी, योगेश वाघ यांना प्रमाणपत्रे जाहीर.

🎉 अभिनंदन आणि शुभेच्छा :सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी व सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी सर्व संस्थांनी सादर केलेल्या उच्च दर्जाच्या प्रयोगांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भविष्यकाळातही उत्तम कामगिरी करावी अशी अपेक्षा मंत्री शेलार यांनी व्यक्त केली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!