
नाशिक, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ – Marathi Natya Spardha महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धा रंगभूमी दिनाच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबरपासून नाशिकच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रंगणार आहेत.
या वर्षी नाशिक केंद्रात तब्बल २६ नाट्यसंस्थांचा सहभाग असून, ५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या २६ दिवसांच्या कालावधीत दररोज एक दर्जेदार नाटक सादर होणार आहे. नाशिककर नाट्यरसिकांसाठी ही एक मोठी नाट्यमहोत्सवी पर्वणी ठरणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार असून, त्यानंतर दररोज सायंकाळी ७ वाजता नाट्यप्रयोगांची रंगत सुरू होईल. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक केंद्राचे समन्वयक राजेश जाधव यांनी नाट्यप्रेमींना आवाहन केले आहे की, “या संपूर्ण महिन्यात दररोज वेगवेगळ्या विषयांवरील उत्कृष्ट नाट्यप्रयोगांचा आनंद घ्या आणि हौशी कलाकारांना प्रोत्साहन द्या.”नाशिककरांनी या रंगभूमी महोत्सवात सहभागी होऊन हौशी कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
🎭 स्पर्धेचे वेळापत्रक (नाशिक केंद्र)(Marathi Natya Spardha)
📍 स्थळ: परशुराम साईखेडकर नाट्यगृह, नाशिक
🗓️ कालावधी: ५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५
⏰ वेळ: दररोज सायंकाळी ७.०० वा.
स्पर्धेचे वेळापत्रक खालील प्रमाणे



