
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
चंद्र: वृषभ राशीत |नक्षत्र: रोहिणी /मृगशीर्ष
तिथी: मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा
योग: चंद्र प्रतियुती मंगळ • चंद्र केंद्र शनी • चंद्र केंद्र नेपच्यून
दक्षिणायन | सौर हेमंत ऋतू | शके १९४७ | संवत २०८२
आजचा दिवस — अत्यंत शुभ, कार्यसिद्धीकारक
राहू काळ: सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आजचा दिवस मेहनतीतून मोठे परिणाम देणारा आहे.मंगळ–चंद्र प्रतियुती ऊर्जेला वेग देते, शनी केंद्रस्थानी स्थैर्य व परिश्रमाचे फल देतो, नेपच्यून केंद्रामुळे अंतर्ज्ञान तीव्र होते. रोहिणी/मृगशीर्षामुळे सौंदर्य, संपन्नता, संवाद, व्यापार, आर्थिक विषय अत्यंत अनुकूल.(Marathi Rashi Bhavishya)
मेष – कामात जबरदस्त गती. आर्थिक लाभ. परंतु रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात नवी योजना पुढे जाईल. प्रेमसंबंधात ऊर्जितावस्था.
वृषभ -चंद्र आपल्या राशीत असल्याने दिवस अत्यंत शुभ. कोणतेही कार्य यशस्वी. आर्थिक स्थैर्य वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी.
मिथुन – नवीन संपर्कातून फायदा. व्यवसायात वाढ. मानसिक चंचलता वाढू शकते. निर्णय शांतपणे घ्या. प्रवास शुभ.
कर्क – घर–कुटुंबात आनंद. आर्थिक लाभ. कामातील अडथळे दूर होतील. दुपारनंतर नवी सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता.
सिंह – नोकरीत प्रगती. वरिष्ठांकडून कौतुक. आर्थिक स्थिती मजबूत. प्रेमसंबंधात रोमँटिक क्षण. आरोग्य चांगले.
कन्या -आजचा दिवस फलदायी. चर्चा, व्यवहार, कागदपत्रे यांत यश. दुपारी थोडी ताणतणाव शक्यता परंतु संध्याकाळी परिस्थिती सुधारेल.
तुळ -भागीदारीत लाभ. नाती मजबूत होतील. आर्थिक विषय सांभाळून करा. सौंदर्य, कला, सजावट कार्यासाठी उत्तम दिवस.
वृश्चिक -कामात मोठे बदल शक्य. चंद्र–मंगळ योगामुळे जिद्द वाढेल. आरोग्य सुधारेल. आर्थिक लाभ, परंतु तडक निर्णय टाळा.
धनु –नवीन शिकणे, प्रवास, परदेशी कामे यासाठी शुभ. आर्थिक लाभ. दुपारी मन अस्थिर राहू शकते. ध्यान, शांतता उपयुक्त.
मकर – जमीन, मालमत्ता, वाहन, बँकिंग विषयात शुभ फळ. कामात स्थैर्य. दुपारनंतर लाभदायक घटना.
कुंभ -मीटिंग, चर्चा, नेटवर्किंगमध्ये यश. मित्रांकडून मदत. चंद्र–शनी केंद्रामुळे निर्णय व्यावहारिक राहतील. व्यवसायासाठी दिवस चांगला.
मीन – अडकलेले पैसे मिळतील. नोकरीत प्रगती. अंतर्ज्ञानाने घेतलेले निर्णय योग्य ठरतील. भावनिक अस्थिरता थोडी वाटू शकते.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)





[…] […]