आजचे राशिभविष्य सोमवार, २९ डिसेंबर २०२५

२९ डिसेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

1

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)

मार्गशीर्ष शुक्ल/पौष कृष्ण. विश्वावसुनाम संवत्सर.शके १९४७, संवत २०८२.

राहुकाळ सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

आज उत्तम दिवस आहे.

चंद्रनक्षत्र रेवती / (सकाळी ७.४१ नंतर) अश्विनी.

आज जन्मलेल्या बाळाची राशी मीन / मेष. (परीघ/शिव योग)

ग्रहस्थिती विशेष:चंद्र त्रिकोण बुध, चंद्र त्रिकोण शुक्र बौद्धिक कार्य, संवाद, कला, आर्थिक व्यवहार व सौंदर्य विषयक गोष्टींसाठी अतिशय शुभ योग.

२९ डिसेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-(Marathi Rashi Bhavishya)

तुमच्यावर चंद्र, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव अधिक असतो. तुम्ही बुद्धिमान, कल्पक आणि सौंदर्याची जाण असणारे व्यक्तिमत्व आहात. बोलण्यात गोडवा असून लोकांना सहज प्रभावित करता. कला, साहित्य, संगीत, लेखन, सल्लागार क्षेत्रात तुम्ही नाव कमावू शकता.तुमची स्मरणशक्ती चांगली असून परिस्थितीचा अचूक अंदाज घेण्याची क्षमता आहे. भावनाशील असले तरी व्यवहारात चातुर्य दाखवता. कधी कधी द्विधा मनस्थितीमुळे निर्णय घेण्यास विलंब होतो. प्रवासाची आवड असून दूरच्या ठिकाणांशी संबंध येतात. आर्थिक बाबतीत हळूहळू पण स्थिर प्रगती करता. नातेसंबंधात समंजसपणा अपेक्षित असतो.

व्यवसाय :- लेखन, मीडिया, शिक्षण, कला, डिझाइन, सल्लागार, व्यापार, कॉस्मेटिक्स, फायनान्स.

शुभ दिवस :- सोमवार, शुक्रवार, बुधवार.

शुभ रंग :- पांढरा, गुलाबी, हिरवा.

शुभ रत्न :- मोती, पाचू.(रत्ने घेताना कुंडलीचा उपयोग करावा)

मेष : (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)-चंद्र त्रिकोण शुक्र असल्याने कौटुंबिक आनंद मिळेल. आर्थिक लाभ होतील. महिलांना विशेष लाभ. प्रवास सुखद ठरेल.

वृषभ : (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)-चंद्र त्रिकोण बुध व्यवहारात चातुर्याने यश मिळेल. नवीन करार, बोलणी यशस्वी ठरतील. नोकरीत प्रशंसा होईल.

मिथुन : (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)-मन प्रसन्न राहील. बौद्धिक कार्यात यश. लेखन, अभ्यास, परीक्षा यासाठी अनुकूल दिवस. मित्रांची साथ लाभेल.

कर्क : (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)-आर्थिक बाजू मजबूत होईल. घरगुती सुख वाढेल. वाहन किंवा वस्त्र खरेदी योग. भावनिक स्थैर्य लाभेल.

सिंह : (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)-मान-सन्मान वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वास वाढवणारा दिवस. संध्याकाळी विश्रांती घ्या.

कन्या : (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)-व्यवसायासाठी उत्तम ग्रहमान. आर्थिक नियोजन यशस्वी होईल. खर्च नियंत्रणात ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या.

तुळ : (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)-चंद्र त्रिकोण शुक्र प्रेमसंबंध दृढ होतील. कला, सौंदर्य, फॅशन क्षेत्रात लाभ. समाजात प्रतिष्ठा वाढेल.

वृश्चिक : (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)-उत्पन्न वाढीचे योग. व्यवहारातून फायदा. स्त्रीधन वाढेल. बौद्धिक कामात यश मिळेल.

धनु : (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)-मोठी संधी मिळू शकते. शिक्षण, कायदेशीर बाबी अनुकूल. परदेशाशी संबंधित कामे पुढे सरकतील.

मकर : (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)हळूहळू प्रगती करणारा दिवस. आर्थिक स्थैर्य येईल. प्रेमसंबंधात स्पष्टता ठेवा. संयम आवश्यक.

कुंभ : (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)-मित्र, भागीदार यांचे सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग. खर्च वाढू शकतो, नियोजन गरजेचे.

मीन : (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)-आजचा दिवस अत्यंत अनुकूल. येणी वसूल होतील. कोर्ट, सरकारी कामात यश. मन प्रसन्न राहील.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
Don`t copy text!