आजचे राशिभविष्य गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
फाल्गुन शुक्ल द्वितीया. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२. उत्तरायण, शिशिर ऋतू.  
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आजचा विशेष दिन – छत्रपती शिवाजी महाराज जयंती
चंद्र नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा / (रात्री ८.५२ नंतर) उत्तराभाद्रपदा.
चंद्र राशी – कुंभ / (दुपारी ३.०० नंतर) मीन.
चंद्र युती शनी. चंद्र लाभ हर्षल. चंद्र युती नेपच्यून.आज उत्तम दिवस.(Marathi Rashi Bhavishya)

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) लाभस्थानी चंद्र असल्याने आर्थिक प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून कौतुक होईल. अचानक लाभाची शक्यता आहे. मित्रपरिवार मदतीला धावून येईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल. शनी युतीमुळे संयम बाळगणे आवश्यक आहे. मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) भाग्यस्थान सक्रिय आहे. दूरचा प्रवास संभवतो. अध्यात्मिक गोष्टीत रस वाढेल. नवीन संधी मिळतील. परदेश संबंधित कामे मार्गी लागतील.
कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) अष्टमस्थानी चंद्र-शनी युती असल्याने आरोग्याची काळजी घ्या. मानसिक ताण टाळा. आर्थिक व्यवहार जपून करा. गूढ विषयात रस वाढेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) सप्तमस्थानी ग्रहयोग अनुकूल आहे. जोडीदाराची साथ लाभेल. भागीदारीत यश मिळेल. नवीन करार फायदेशीर ठरतील.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) कार्यक्षेत्रात मेहनत वाढेल. आरोग्य सुधारेल. जुनी अडचण दूर होईल. कर्मयोग मजबूत आहे. शिस्त पाळल्यास यश निश्चित.
तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पंचमस्थानी चंद्र लाभदायक आहे. संतती सुख मिळेल. विद्यार्थ्यांना उत्तम यश. प्रेमप्रकरणात अनुकूलता राहील. सर्जनशीलता वाढेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) गृहसौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. स्थावर मालमत्तेचे प्रश्न सुटतील. मातृकृपा लाभेल.
धनु:– (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तृतीयस्थानी चंद्रामुळे धाडस वाढेल. लहान प्रवास घडतील. भावंडांशी संबंध दृढ होतील. लेखन, वक्तृत्व क्षेत्रात यश.
मकर:– (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) धनस्थान सक्रिय आहे. आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीत फायदा संभवतो. मौल्यवान वस्तू खरेदी होईल. कुटुंबात आनंद.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) तुमच्याच राशीत चंद्र-शनी युती आहे. गंभीर निर्णय घ्यावे लागतील. व्यक्तिमत्त्व प्रभावी राहील. दुपारनंतर मन शांत होईल. प्रतिष्ठा वाढेल.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) दुपारी ३ नंतर चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करेल. मनोबल वाढेल. कल्पनाशक्ती प्रबळ राहील. आध्यात्मिक लाभ होईल. नवीन सुरुवात करण्यास अनुकूल वेळ.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!