आजचे राशिभविष्य शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
फाल्गुन शुक्ल चतुर्थी.विश्वावसुनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस आहे.”
नक्षत्र – रेवती / (संध्याकाळी ७.०७ नंतर) अश्विनी
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन / (संध्याकाळी ७.०७ नंतर) मेष(नक्षत्र गंडांत. विष्टी करण – अशुभ)
चंद्र लाभ मंगल.विनायकी चतुर्थी – श्री गणेश कृपेचा दिवस.(Marathi Rashi Bhavishya)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)संध्याकाळनंतर चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे. आत्मविश्वास वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम वेळ. मात्र उतावळेपणा टाळा. वाहन चालवताना दक्षता घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)आर्थिक लाभाची शक्यता आहे. जुने अडकलेले पैसे मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. परंतु हट्टीपणा केल्यास वाद संभवतो. संयम ठेवा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)मित्रपरिवाराकडून मदत मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. दुपारनंतर काही शुभवार्ता मिळू शकते. गुपित गोष्टी उघड करू नका.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)नोकरीत प्रगतीची चिन्हे दिसत आहेत. वरिष्ठांची कृपा लाभेल. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान करा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)भाग्याची साथ लाभेल. प्रवास योग संभवतो. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. मात्र अहंकारामुळे नातेसंबंध बिघडू देऊ नका.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)गंडांत नक्षत्राचा प्रभाव जाणवेल. निर्णय घेताना घाई करू नका. आरोग्याची विशेष काळजी घ्या. संशोधन, लेखन आणि अभ्यासात यश.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. भागीदारीच्या कामात प्रगती होईल. दुपारनंतर वातावरण अनुकूल होईल. मात्र आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)कामाचा ताण वाढेल पण त्यातूनच यश मिळेल. आरोग्य सुधारेल. शत्रू निष्प्रभ ठरतील. संयमी राहा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)सर्जनशीलतेला वाव मिळेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. प्रेमसंबंधात आनंद मिळेल. अनावश्यक खर्च टाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)घरगुती प्रश्न सुटतील. स्थावर मालमत्तेचे व्यवहार लाभदायक. मातृसुख मिळेल. मात्र बोलण्यात कटुता येऊ देऊ नका.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)लहान प्रवास संभवतो. भावंडांशी संबंध सुधारतील. धाडसी निर्णय घ्याल. परंतु कागदपत्रे तपासूनच सही करा.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)आज चंद्र तुमच्या राशीत असल्याने मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. दुपारनंतर विशेष यश मिळेल. व्यसन आणि मोह टाळा.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!