आजचे राशिभविष्य रविवार,२२ फेब्रुवारी २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
फाल्गुन शुक्ल पंचमी.शिशिर ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर.
राहुकाळ – सायंकाळी ४.३० ते ६.००
“आज चांगला दिवस आहे.”
चंद्रनक्षत्र – अश्विनी / (संध्याकाळी ५.५५ नंतर) भरणी.आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष.
रवी लाभ चंद्र, शुक्र त्रिकोण गुरू – अत्यंत शुभ ग्रहयोग. उत्साह, कीर्ती आणि आर्थिक प्रगतीचे संकेत.(Marathi Rashi Bhavishya)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. नवीन कार्यारंभासाठी उत्तम दिवस. वरिष्ठांकडून कौतुक होईल. मात्र रागावर नियंत्रण ठेवा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)खर्च वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. परदेशी संपर्कातून लाभ होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)मित्रपरिवाराकडून सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात नावलौकिक वाढेल. एखादी महत्त्वाची भेट होऊ शकते. आर्थिक लाभ संभवतो.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठ खुश राहतील. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. वाहन चालवताना काळजी घ्या.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)भाग्याची उत्तम साथ आहे. प्रवास योग संभवतो. धार्मिक स्थळी भेट द्याल. मन प्रसन्न राहील. अहंकार टाळा.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)गुप्त लाभ संभवतो. संशोधन, अभ्यासात यश मिळेल. अनपेक्षित खर्च संभवतो. आरोग्याची काळजी घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारीत प्रगती होईल. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा. गोड बोलल्याने कामे साध्य होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)कामाचा ताण वाढेल पण यश निश्चित आहे. शत्रू निष्प्रभ ठरतील. आरोग्य सुधारेल. संयम बाळगा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)सर्जनशीलता वाढेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रेमसंबंधात आनंद मिळेल. मौल्यवान वस्तू सांभाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)घरगुती प्रश्न सुटतील. स्थावर मालमत्तेचे व्यवहार लाभदायक ठरतील. मातृसुख लाभेल. बोलण्यात कटुता टाळा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)लहान प्रवास संभवतो. भावंडांशी संबंध सुधारतील. धाडसी निर्णय घ्याल. कागदपत्रे तपासूनच सही करा.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)संमिश्र दिवस आहे. व्यय वाढेल पण त्यातूनच लाभ मिळेल. आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. संयम आणि श्रद्धा ठेवा.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!