
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
फाल्गुन शुक्ल त्रयोदशी. शिशिर ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२.
राहुकाळ – संध्याकाळी ४.३० ते ६.००
आज चांगला दिवस आहे. प्रदोष.(Marathi Rashi Bhavishya)
चंद्रनक्षत्र – पुष्य (सकाळी ८.३४ पर्यंत) नंतर आश्लेषा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क. नक्षत्र गंडांत शांती.
१ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर रवी आणि गुरूचा प्रभाव आहे. तुमचा स्वभाव महत्वाकांक्षी असून अनेक गोष्टीत तुम्ही रस घेतात. तुम्ही स्वतंत्र विचाराचे आणि बुद्धीचे आहात. भाषा चातुर्यानमुळे तुम्ही दुसऱ्यांवर सहजपणे छाप पडतात. मान मान्यता, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना तुम्ही अधिक महत्त्व देतात. तुमची वृत्ती स्वतंत्र आहे. कलेबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही बुद्धिमान असून तत्त्वज्ञान हा तुमचा आवडता विषय आहे. तुम्ही सतत कार्य मग्न राहतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार असतात. एकाच विषयामध्ये तुमचे मन फार काळ रमत नाही. मैत्रीमध्ये आणि व्यवसायामध्ये अनेक बदल दिसून येतात. संशोधन करण्याची तुमची प्रवृत्ती आहे. मानवी स्वभाव ओळखण्याचे तुम्हाला उपजतच ज्ञान असते. तुम्ही सभ्य आणि विशाल दृष्टिकोनाचे आहात. मित्रांशी आणि नातेवाईकांशी तुम्ही प्रामाणिक असतात. तुमच्या जीवनामध्ये शिस्त असते. व्यावहारिक जीवनाबरोबरच गूढ जीवनाचे तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही उदार मनाचे असलात तरी आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करतात. तुम्ही सर्व प्रकारच्या समाजामध्ये झटकन मिसळतात. तुम्ही अत्यंत हुशार आणि बुद्धिमान असून शेजाऱ्यांशी तुमचे चांगले जमते. तुमचे जीवन समाधानी आणि सुखी असते.
शुभ दिवस: सोमवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग – पिवळा, सोनेरी, जांभळा.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)-चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेशी संबंधित कामे पुढे जातील. आईकडून लाभ संभवतो. वाहन जपून चालवा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)-तृतीय चंद्र धाडस वाढवेल. छोट्या प्रवासाचा योग आहे. भावंडांशी संवाद वाढेल. एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा)-द्वितीय चंद्र आर्थिक बाबींमध्ये लाभ देईल. नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडेल. बोलण्यात प्रभाव राहील. कुटुंबात आनंदी वातावरण.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)-राशीत चंद्र आहे. अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. नवे कार्य हाती घ्याल. प्रतिष्ठा वाढेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)-द्वादश चंद्र खर्च वाढवेल. आध्यात्मिक कार्यात मन रमलेले राहील. परदेश संबंधी कार्यास गती येईल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा, णा,ठा,पे,पो)-लाभस्थानी चंद्र आहे. मित्रांकडून मदत मिळेल. आर्थिक प्रगतीचा दिवस आहे. एखादी चांगली बातमी मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)-दशम चंद्र करिअरमध्ये प्रगती देईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नोकरीत जबाबदारी वाढेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)-भाग्यस्थानी चंद्र आहे. प्रवासाचा योग आहे. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)-अष्टम चंद्र सावधगिरीचा इशारा देतो. आरोग्याची काळजी घ्या. गुप्त शत्रूपासून सावध रहा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी)-सप्तम चंद्र दाम्पत्य जीवनात आनंद देईल. भागीदारीत लाभ होईल. व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)-षष्ठ चंद्र कार्यक्षेत्रात स्पर्धा वाढवेल. मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)-पंचम चंद्र सर्जनशीलता वाढवेल. संततीसुख लाभेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


