आजचे राशिभविष्य सोमवार, २३ मार्च २०२६ 

२३ मार्च रोजी जन्माला आलेल्या लोकांची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक(Marathi Rashi Bhavishya)
चैत्र शुक्ल पंचमी. वसंत ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८२.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – कृत्तिका / (रात्री ८.५० नंतर) रोहिणी.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.

२३ मार्च रोजी जन्माला आलेल्या लोकांची वैशिष्ट्ये :- (Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर बुध आणि गुरू ग्रहांचा अंमल आहे. तुम्ही अभ्यासू आहात. कायद्याचे पालन करणे तुम्हाला आवडते. तुम्ही शांतता प्रिय आहात मात्र तुमच्या भोवती काही वेळेस चुकीचे मित्र असतात. तुम्ही जसे व्यावहारिक अशात तसेच अध्यात्मिक आणि धार्मिक देखील आहात. तुम्हाला संगीत, वाङ्मय, लेखन आणि प्रवासाची आवड असते. तुमचा भाग्योदय पाण्याजवळ होतो. तुमच्या वरिष्ठ लोकांकडून तुम्हाला संरक्षण मिळते. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. तुम्ही उद्योगमग्न असतात. तुमचे वक्तृत्व, लेखन, भाषण चांगले असते. तुम्हाला बऱ्याच वेळा फार घाई असते.

तुम्ही दिसायला देखणे असतात. तुम्ही सहसा इतरांना दुखावत नाहीत. हातचे राखून बोलतात. फारसे बडबड करणे तुम्हाला आवडत नाही. तुमची निरीक्षण शक्ती उत्तम असते. तुम्ही ठाम असतात. तुम्हाला कोडी सोडवण्याचा आणि लॉटरीचा नाद असतो. महिला सुखी असतात मात्र संतती संबंधित काही अडचणी निर्माण होऊ शकतात. स्वतःच्या व्यवसायात यश मिळते मात्र घरच्या व्यक्तींकडून काही वेळेस त्रास संभवतो.

तुमच्यात व्यापारी वृत्ती आहे. तुम्हाला अंत:स्फूर्तीची देणगी आहे. तुम्हाला स्वतःचे विचार इतरांना व्यवस्थित समजावून सांगता येतात. तुम्ही तुमच्या उद्देश पूर्तीसाठी मनापासून झटतात. तुम्हाला खेळण्याची आणि प्रवासाची आवड आहे. तुम्हाला अवती भवती मित्रांचा किंवा ओळखीच्या लोकांचा गराडा आवडतो. तुम्हाला सण समारंभात भाग घेणे आवडते. तुमच्यात जलदपणा आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्हाला आळशीपणा आवडत नाही. तुम्ही कोणत्याही अवघड परिस्थितीतून बरोबर मार्ग काढतात. तुमचा दृष्टीकोन विशाल आणि संयमी आहे. तुम्ही योग्य नियोजन करून कामात यश खेचून आणतात. तुम्हाला ‘धर्म, ज्ञान, विज्ञान आणि तत्वज्ञान’ यांची आवड असते. इतरांचे कमजोर मुद्दे तुम्ही बरोबर शोधून काढतात. महत्वाकांक्षा, धार्मिकता, विनोदबुद्धी, स्वाभिमान आणि नम्रपणा हे तुमचे गुण आहेत. तुम्ही आळशीपणा, साशंक वृत्ती टाळली पाहिजे. तुमचा स्वभाव स्वप्नांळू आहे.

व्यवसाय: बँकिंग, वैद्यकीय, औषध दुकाने, प्रयोगशाळा उपकरणे, वकील, गणितज्ञ, पॅथॉलॉजी इत्यादी.
आरोग्य: तुम्ही पित्त कारक असून मानसिक तणाव टाळला पाहिजे. उन्हाचा त्रास, मज्जातंतू, श्वसनक्रिया, झोपेची तक्रार, नैराश्य, संधिवात, पोटाच्या तक्रारी, पायाचे त्रास यांपासून काळजी घ्या.
शुभ दिवस : बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग: पिवळा, पांढरा, हिरवा.
शुभ रत्ने : हिरा, पाचू, इंद्रनील.
“आज वर्ज्य दिवस आहे.”
रवी लाभ चंद्र, चंद्र केंद्र बुध, चंद्र लाभ शनी, चंद्र युती हर्षल, चंद्र लाभ नेपच्यून.

मेष:–संमिश्र दिवस आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. खर्च वाढू शकतो. कामात स्थिरता ठेवा. घाईघाईत निर्णय घेऊ नका.
वृषभ:–तुमच्या राशीत चंद्र आहे. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सुख मिळेल. आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठा वाढेल.
मिथुन:--मन अस्थिर राहू शकते. गुप्त चिंता त्रास देऊ शकते. खर्च वाढेल. ध्यान-धारणा केल्यास लाभ होईल.
कर्क:–अनुकूल दिवस आहे. मित्रांकडून मदत मिळेल. नवीन योजना यशस्वी होतील. आर्थिक लाभ संभवतो.
सिंह:–कार्यस्थळी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे असेल. संयम ठेवा. प्रतिष्ठा वाढेल.
कन्या:--भाग्याची साथ मिळेल. प्रवास योग संभवतो. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. मन प्रसन्न राहील.
तुळ:–संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. अचानक बदल होऊ शकतात. संयमाने वागा.
वृश्चिक:--संबंधांमध्ये गोडवा राहील. जोडीदाराची साथ मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. नवीन संधी मिळतील.
धनु:-कामात व्यस्त राहाल. आरोग्याची काळजी घ्या. शत्रूंवर विजय मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल.
मकर:-सर्जनशील कामात यश मिळेल. मुलांकडून आनंद मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. मन प्रसन्न राहील.
कुंभ:-घरगुती कामात वेळ जाईल. मालमत्तेसंबंधी निर्णय घ्याल. आई-वडिलांची साथ मिळेल.
मीन:-संवादातून लाभ होईल. नवीन ओळखी निर्माण होतील. लहान प्रवास होऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!