
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अधिक ज्येष्ठ कृष्ण दशमी.ग्रीष्म ऋतू.पराभव नाम संवत्सर.शके १९४८,संवत २०८२.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे.”
नक्षत्र – उत्तराभाद्रपदा / सकाळी ९.२२ नंतर रेवती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन. (दुपारी १.५३ नंतर विष्टी करण)
रवी लाभ चंद्र.
चंद्र केंद्र बुध.
चंद्र युती शनी.
बुध केंद्र शनी.
राशिभविष्य -(Marathi Rashi Bhavishya)
मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) लाभदायक घडामोडी घडतील. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहारात यश मिळण्याची शक्यता आहे. दुपारनंतर काही कामांमध्ये विलंब होऊ शकतो. संयम ठेवा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नवीन संधींचा लाभ घ्या. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) भाग्याची साथ मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. शिक्षण, लेखन आणि बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा. अनपेक्षित खर्च वाढू शकतात. संशोधनात्मक कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) भागीदारीच्या कामात लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
कन्या:– (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. शत्रूपक्षावर विजय मिळवाल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सर्जनशील कार्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. संततीकडून आनंदवार्ता मिळू शकते.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) घरगुती विषयांना प्राधान्य द्यावे लागेल. मालमत्तेशी संबंधित कामे मार्गी लागतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक समाधान लाभेल.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. लहान प्रवास फायदेशीर ठरतील. भावंडांचे सहकार्य मिळेल. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी पडतील.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कुटुंबातील व्यक्तींशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. गुंतवणुकीसाठी दिवस मध्यम आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) चंद्र राशीपासून द्वितीयस्थानी असल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. निर्णयक्षमता चांगली राहील.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) राशीस्थानी चंद्र आणि शनी युतीमुळे जबाबदाऱ्या वाढतील. संयम आणि चिकाटीने कामे पूर्ण कराल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. आध्यात्मिक विषयांत रुची वाढेल.
(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)



