आजचे राशिभविष्य सोमवार, १५ जून २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अधिक ज्येष्ठ अमावस्या / सकाळी ८.२४ नंतर प्रतिपदा. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
⏰ राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
🌙 चंद्र नक्षत्र – मृगशीर्ष / संध्याकाळी ७.०९ नंतर आर्द्रा.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ / सकाळी ८.४१ नंतर मिथुन. (शूल योग / सकाळी ८
५६ नंतर गंड योग, सकाळी ८.२४ पर्यंत नाग करण/ नंतर संध्याकाळी ६.२७ पर्यंत किंस्तूंघ्न करण) अशुभ.
✨ “आज संयम आणि नियोजन यांना विशेष महत्त्व आहे.”
⚠️ आज क्षय तिथी. *सोमवती अमावस्या आहे*
🔭 रवी युती चंद्र.
🔭 चंद्र केंद्र नेपच्यून.
🔭 शुक्र लाभ हर्षल.

🪔 राशिभविष्य (Marathi Rashi Bhavishya)

मेष:- अनुकूल ग्रहमान आहे. मित्रपरिवारातून सहकार्य मिळेल. नवीन योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. रवी-चंद्र युतीमुळे भावनिक निर्णय घेणे टाळा. संयमाने वागल्यास दिवस लाभदायक ठरेल.

वृषभ:- सकाळपर्यंत चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे सकाळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नवीन खरेदीचा योग संभवतो. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. सकाळनंतर खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील.

मिथुन:- सकाळनंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने उत्साह वाढेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. लेखन, शिक्षण आणि संवाद क्षेत्रात यश मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

कर्क:- खर्च वाढण्याची शक्यता आहे. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे न घडल्याने मन अस्वस्थ होऊ शकते. आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. दूरच्या व्यक्तीकडून शुभवार्ता मिळू शकते. संयम ठेवा.

सिंह:- लाभ स्थानी चंद्र असल्याने आर्थिक लाभ होतील. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नवीन योजना यशस्वी ठरतील. रखडलेली कामे मार्गी लागतील.

कन्या:– कर्मस्थानी चंद्र असल्याने कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. तुमच्या कार्यक्षमतेचा प्रभाव पडेल. आरोग्याची काळजी घ्या.

तुळ:- भाग्यस्थानी चंद्र असल्याने धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल. प्रवासाचे योग संभवतात. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. मनातील काही इच्छा पूर्ण होतील.

वृश्चिक:- अष्टम स्थानी चंद्र असल्याने आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. गुप्त विषय आणि संशोधनात्मक कामात यश मिळू शकते. संयम आणि शांतता राखा.

धनु:- सप्तम स्थानी चंद्र असल्याने वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवसायात लाभ संभवतो. नवीन संबंध प्रस्थापित होतील. सामाजिक संपर्क वाढतील.

मकर:- षष्ठ स्थानी चंद्र असल्याने कामाचा ताण वाढेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. नियमित कामकाजातून लाभ मिळेल. संयम लाभदायक ठरेल.

कुंभ:– पंचम स्थानी चंद्र असल्याने कला, साहित्य आणि सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक लाभाचे योग आहेत.

मीन:- चतुर्थ स्थानी चंद्र असल्याने घरगुती वातावरण आनंददायी राहील. स्थावर मालमत्तेच्या कामात प्रगती होईल. आईच्या सहकार्याचा लाभ मिळेल. मानसिक समाधान लाभेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!