आजचे राशिभविष्य गुरुवार,२३ जुलै २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
आषाढ शुक्ल नवमी / सकाळी ७.०४ नंतर दशमी. ग्रीष्म ऋतू.पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.  
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज वर्ज्य दिवस आहे.”  चंद्र नक्षत्र – विशाखा.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तूळ / संध्याकाळी ७.०१ नंतर वृश्चिक.
शुक्र षडाष्टक शनी.
राशिभविष्य – (Marathi Rashi Bhavishya)
मेष:– (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)भाग्याची उत्तम साथ लाभेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. महत्त्वाची कामे नियोजनपूर्वक पूर्ण करा.

वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. संयमाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)भागीदारीच्या कामात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन संपर्क भविष्यात उपयोगी ठरतील. संवादकौशल्यामुळे कामे मार्गी लागतील.

कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)कामाचा व्याप वाढेल, पण मेहनतीचे चांगले फळ मिळेल. वरिष्ठांची कृपा लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमितपणा लाभदायक ठरेल.

सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)विद्यार्थी आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात मधुरता राहील.

कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी कामात प्रगती होईल. मानसिक समाधान लाभेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी पडेल.

तुळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)संध्याकाळपर्यंत राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. संध्याकाळनंतर भावनांवर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)संध्याकाळी ७.०१ नंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने उत्साह वाढेल. नवीन योजना आखण्यासाठी वेळ अनुकूल राहील. आत्मविश्वासामुळे कामात यश मिळेल.

धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

कुंभ:– (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)भाग्याची साथ लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.

मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)आर्थिक व्यवहारात यश मिळेल. बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. संयमाने वागल्यास दिवस समाधानकारक जाईल.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!