ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
आषाढ शुक्ल एकादशी. ग्रीष्म ऋतू.पराभव नाम संवत्सर – शके १९४८ – संवत २०८२
चंद्र – वृश्चिक राशीत नक्षत्र – ज्येष्ठ
राहुकाळ – सकाळी ९.०० ते १०.३०
आज वर्ज्य दिवस आहे. *आषाढी एकादशी* शयनी एकादशी, चातुर्मास आरंभ, पंढरपूर यात्रा.
ग्रहयोग – चंद्र प्रतियुती मंगळ, चंद्र केंद्र शुक्र, चंद्र त्रिकोण शनी
विशेष: शनिवार – शनिदेव, कर्म, संयम आणि न्याय यांचा दिवस. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये संयम ठेवा. प्रलंबित कामे नियोजनपूर्वक पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
राशिभविष्य – (Marathi Rashi Bhavishya)
मेष (Aries)व्यवसायातील अडचणी दूर होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. संयमाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. उपाय: हनुमान चालीसाचे पठण करा.
वृषभ (Taurus)आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल. उपाय: शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा.
मिथुन (Gemini)नवीन कल्पना आणि योजना यशस्वी ठरतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. संवादकौशल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. उपाय: श्रीगणेशाला दूर्वा अर्पण करा.
कर्क (Cancer)घरगुती वातावरण आनंददायी राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. उपाय: भगवान शिवाचे नामस्मरण करा.
सिंह (Leo)भाग्याची साथ लाभेल. प्रवासातून लाभ मिळू शकतो. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. उपाय: सूर्याला अर्घ्य द्या.
कन्या (Virgo)कामातील शिस्त आणि नियोजनामुळे यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. उपाय: विष्णू सहस्रनामाचा जप करा.
तुळ (Libra)भागीदारीच्या कामात लाभ होईल. चंद्र-शुक्र केंद्र योगामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील. कला आणि सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. उपाय: महालक्ष्मीची उपासना करा.
वृश्चिक (Scorpio)राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. चंद्र-शनी त्रिकोण योगामुळे संयम आणि चिकाटीने कामात यश मिळेल. चंद्र-मंगळ प्रतियुतीमुळे रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. उपाय: भगवान शिवाला जल अर्पण करा.
धनु (Sagittarius)अनावश्यक खर्च टाळा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. संयमाने वागल्यास दिवस समाधानकारक जाईल. उपाय: गुरू मंत्राचा जप करा.
मकर (Capricorn)मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. उपाय: शनिदेवाला तेल अर्पण करा.
कुंभ (Aquarius)व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांची कृपा लाभेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. उपाय: गरजू व्यक्तींना अन्नदान करा.
मीन (Pisces)भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. उपाय: भगवान विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा.
(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)




