ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
आषाढ शुक्ल नवमी. ग्रीष्म ऋतू.पराभव नाम संवत्सर.शके १९४८, संवत २०८२.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज वर्ज्य दिवस असून वृद्धी तिथी आहे.”
नक्षत्र – स्वाती. आज जन्मलेल्या बाळाची राशी – तूळ.
चंद्र त्रिकोण बुध. चंद्र लाभ शुक्र.
राशिभविष्य – (Marathi Rashi Bhavishya)
.
मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)कामात उत्साह राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन योजना तयार करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)आर्थिक व्यवहारात संयम बाळगा. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. नियोजनबद्ध कामातून यश मिळेल.
मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)चंद्र-बुध त्रिकोण योगामुळे बुद्धिमत्ता आणि संवादकौशल्याचा लाभ होईल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील.
कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.
सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)भाग्याची साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. संशोधन व अभ्यासात प्रगती होईल. संयम आणि चिकाटी लाभदायक ठरेल.
तुळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. चंद्र-शुक्र लाभ योगामुळे आर्थिक लाभाचे संकेत आहेत. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील.
वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. संयमाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. मानसिक शांतता लाभेल.
धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी पडतील.
मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)व्यवसाय आणि नोकरीत चांगली प्रगती होईल. वरिष्ठांची कृपा लाभेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. अपेक्षित यश मिळेल.
कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)भाग्याची उत्तम साथ लाभेल. शिक्षण, स्पर्धा आणि प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.
मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)कामाचा व्याप वाढेल, पण मेहनतीचे योग्य फळ मिळेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. संयम आणि शिस्त लाभदायक ठरेल.
(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)




