ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
आषाढ शुक्ल सप्तमी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
⏰ राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
🌙 चंद्र नक्षत्र – हस्त / संध्याकाळी ७.१० नंतर चित्रा.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.
“आज शुभ दिवस आहे.”
🔭 चंद्र त्रिकोण मंगळ.
🔭 चंद्र केंद्र बुध.
🔭 चंद्र प्रतियुती शनी.
🔭 गुरू त्रिकोण नेपच्यून.
🪔 राशिभविष्य -(Marathi Rashi Bhavishya)
🐏 मेष:-
कामात उत्साह आणि धाडस दिसून येईल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीतही सकारात्मक घडामोडी होतील.
🐂 वृषभ:-
कुटुंबीयांसोबत आनंददायी वेळ व्यतीत कराल. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. स्थावर मालमत्तेच्या कामात प्रगती होईल. संयम आणि व्यवहारकुशलता लाभदायक ठरेल.
👬 मिथुन:-
बुधाच्या अनुकूल प्रभावामुळे संवादकौशल्य वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. लहान प्रवासाचा योग संभवतो.
🦀 कर्क:-
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका.
🦁 सिंह:-
आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होईल. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस लाभदायक आहे.
🌾 कन्या:-
राशीस्थानी चंद्र असल्याने व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल. नवीन योजना आखण्यासाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मान-सन्मान वाढेल.
⚖️ तुळ:-
खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. संयमाने वागल्यास अडचणी सहज दूर होतील. संध्याकाळनंतर परिस्थिती अधिक अनुकूल राहील.
🦂 वृश्चिक:-
मित्र आणि सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.
🏹 धनु:-
नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. समाजात मान-सन्मान वाढेल.
🐐 मकर:-
भाग्याची साथ लाभेल. धार्मिक आणि शुभ कार्यात सहभाग घ्याल. प्रवासाचे योग संभवतात. नवीन संधींचा योग्य लाभ घ्या.
🏺 कुंभ:-
संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. सर्जनशील कामात यश मिळेल. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
🐟 मीन:-
घरगुती वातावरण प्रसन्न राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मानसिक समाधान आणि स्थैर्य अनुभवता येईल.
(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)




