आजचे राशिभविष्य गुरुवार,१० सप्टेंबर २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक(Marathi Rashi Bhavishya)
श्रावण कृष्ण चतुर्दशी / सकाळी १०.३४ नंतर अमावस्या. वर्षा ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
नक्षत्र – मघा / दुपारी २.०५ नंतर पूर्वा फाल्गुनी.
चंद्र राशी – सिंह.
चंद्र केंद्र हर्षल.
आज वर्ज्य दिवस आहे. *दर्श पिठोरी अमावस्या आणि पोळा.* त्यामुळे नवीन कामाची सुरुवात, मोठे आर्थिक व्यवहार आणि महत्त्वाचे निर्णय शक्यतो टाळावेत. नियमित कामकाज विचारपूर्वक करता येईल. मन शांत ठेवून नियोजन केल्यास दिवसाचा योग्य उपयोग करता येईल.

१० सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर रवी आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही इतरांची परीक्षा उत्तमपणे करू शकतात. मित्र आणि नातेवाईक यांच्या गुप्त गोष्टी तुम्ही बाहेर बोलत नाहीत. तुमचा सल्ला व्यावहारिक असतो. घराकडे फारसा ओढा नसतो. तुमच्या कामात तुम्ही अभयसू असतात. तुमचा स्वभाव धडपड्या, भादेखोर आणि अति महत्वाकांक्षी असतो. व्यवसायात आणि नोकरीत तुम्हाला उत्तम यश मिळते. इतरांकडून तुम्हाला योग प्रतिसाद मिळत नाही. वयाच्या ४६ व्या वर्षी तुमचा उत्कर्ष होतो. तुमची अभिरुची अत्यंत उच्च असते. तुम्ही हुशार, बुद्धिमान, शास्त्राची आवड असलेले आहात. तुमची वृत्ती व्यापारी आहे. तुमचा कामाचा झपाटा मोठा असतो. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून क्रीडा प्रकारांची आवड आहे. स्वतःचे विचार तुम्ही मित्रांना उत्तम प्रकारे समजून सांगू शकतात. एखाद्या कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्या आवडतात. तुम्ही एक कलाकार आहात आणि जीवनाच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला ओढ आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. नीती अनीती आणि परंपरा याच्या कल्पना तुमच्या जरा वेगळ्या असतात. तुम्ही सतत उद्योगप्रिय असतात. तुमच्यामध्ये उत्साह आहे तुम्ही इतरांचा आदर करतात. इतरांच्या गुप्त गोष्टींचा तुम्ही बाहेर उच्चार करत नाहीत. तुमच्याशी सल्लामसलत केल्यास तुमचे मित्र निराशा आणि तणाव यापासून मुक्त राहतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. सर्व प्रकारच्या लोकांमध्ये तुम्ही मिसळतात. तुम्ही फारसा सखोल अभ्यास करत नाहीत मात्र वक्तृत्व चांगले असते. तुमच्या संशोधनातून जगाला फायदा होतो. इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही काम करत असतात. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. तुमचे व्यक्तिमत्व दुहेरी आहे. तुम्ही एकाच वेळी व्यवहारी देखील असतात आणि ध्येयवादी सुद्धा असतात. मोठेपणा आणि प्रसिद्धी याची हाव टाळली पाहिजे.

व्यवसाय:- जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, इंटरियर डेकोरेटर, चित्रपट निर्माते, चित्रपट दिग्दर्शक, स्टुडिओ मॅनेजर, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, बँकिंग, औषध, वैद्यकीय क्षेत्र, वकील.

शुभ दिवस:- रविवार आणि गुरुवार.

शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, नारंगी आणि जांभळा.

शुभ रत्न:- पाचू आणि माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

राशिभविष्य -.

मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
कामाच्या ठिकाणी काही बदल जाणवतील. वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अचानक येणाऱ्या संधींचा विचारपूर्वक उपयोग करा. घाईघाईने निर्णय घेणे टाळा.

वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आर्थिक बाबतीत काही चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरी-व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. नवीन काम सुरू करण्यापूर्वी योग्य नियोजन करा.

मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
संवादकौशल्याचा चांगला उपयोग होईल. व्यावसायिक संपर्क वाढतील. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची काळजी घ्या. अनावश्यक वाद टाळा.

कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकला.

सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. चंद्र-हर्षल केंद्र योगामुळे विचारांमध्ये आणि योजनांमध्ये अचानक बदल होऊ शकतात. नवीन कल्पना सुचतील; मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी नीट विचार करा. संयम राखल्यास दिवस चांगला जाईल.

कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
नोकरी-व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. खर्च वाढण्याची शक्यता आहे. जुन्या कामांवर लक्ष केंद्रित करा. आरोग्याची काळजी घ्या.

तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक संपर्कातून काही नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीत लाभाची शक्यता आहे. मात्र वर्ज्य दिवस असल्याने मोठे निर्णय घेण्याची घाई करू नका.

वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
नोकरी-व्यवसायात जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांशी मतभेद होऊ नयेत याची काळजी घ्या. आर्थिक नियोजन आवश्यक आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यातून मानसिक समाधान मिळेल.

धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भाग्याची साथ मिळेल, मात्र कामात काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. प्रवासाचे नियोजन करताना काळजी घ्या. अनुभवी व्यक्तींचा सल्ला लाभदायक ठरेल. नवीन योजना प्रत्यक्षात आणण्याची घाई टाळा.

मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
कामाचा ताण वाढेल. मेहनतीचे फळ मिळेल, मात्र काही कामांना अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. आर्थिक व्यवहारात सावधगिरी ठेवा. वरिष्ठांचे सहकार्य मिळवण्यासाठी संयमाने संवाद साधा.

कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
सर्जनशील कार्यात नवीन कल्पना सुचतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस मिश्र स्वरूपाचा आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. अचानक बदलणाऱ्या परिस्थितीत शांतपणे निर्णय घ्या. अनावश्यक खर्च टाळा.

मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
कौटुंबिक वातावरणात काही बदल होऊ शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. घरगुती कामांमध्ये जबाबदारी वाढेल. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!