आजचे राशिभविष्य मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक(Marathi Rashi Bhavishya)
श्रावण शुक्ल षष्ठी / संध्याकाळी ५.५१ नंतर सप्तमी. वर्षा ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
आज चांगला दिवस आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नियोजनपूर्वक आणि आत्मविश्वासाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.
चंद्रनक्षत्र – स्वाती.
चंद्र राशी – तूळ.
चंद्र त्रिकोण मंगळ.
चंद्र केंद्र गुरू.

१८ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर मंगळ रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्यात जबरदस्त इश्चशक्ती आणि कारारीपणा आहे. तुम्ही निर्णभय आहात. धैर्यवान आहात. इतरांवर हुकूमत गाजवणे तुम्हाला आवडते. तुम्ही सुदृढ आहात. विकारणावर मात करता आली पाहिजे. त्यासाठी ध्यान धारणा आवश्यक आहे. तुमचं स्मरण शक्ती चांगली आहे. तुम्ही कष्टाळू, हुशार आणि योग्य निर्णय घेणारे आहेत. तुम्हाला वारसा हक्काने इस्टेट आणि कला मिळतात. भूतकाळातील चुकांमधून आणि अनुभवातून तुम्ही शिकतात. वैवाहिक जीवनातील समस्यांचा तुमच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. तुम्ही आक्रमक, लढाऊ आणि धाडसी आहात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. सहसा तुमचा कधीही पराभव होत नाही. मिल्ट्री, पोलीस याच्यात तुम्ही उत्तम चमक दाखवू शकतात. तुम्ही स्पष्ट वक्ते आहात मात्र शब्द जपून वापरला पाहिजे. मनाने तुम्ही विशाल आहात आणि मानवी जीवनाचे तुम्हाला उत्तम जाण आहे. तुम्ही इतरांना उत्साह देतात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असले तरी तुम्ही त्यातून बाहेर पडू शकतात. तुमचा स्वभाव तापट आहे. मैदानी खेळ आणि व्यायाम याचे तुम्हाला आवड आहे. भिन्नलिंगी व्यक्तींकडे तुम्ही आकर्षित होतात. लैंगिक भावनांवर तुम्ही नियंत्रण ठेवले पाहिजे. तुम्हाला कधीही कशाची भीती वाटत नाही. मैत्रीसाठी तुम्ही काहीही करू शकतात. दुर्बल लोकांबद्दल तुम्हाला दया वाटते. तुम्हाला गूढ अनुभव येतात. प्रवासामुळे तुमचा दृष्टिकोन सुधारतो आणि सहनशीलता निर्माण होऊ शकते. तुम्ही काळाच्या पुढचा विचार करू शकतात. तुमच्या आवडीनिवडील बद्दल तुम्ही ठाम असतात. तुमचे तत्व तुम्ही कधीही सोडत नाहीत.

व्यवसाय:- पोलीस, मिलिटरी, गुप्तहेर, राजकीय क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र, डॉक्टर, केमिस्ट, राजकीय लेखन, पत्रकार, फायर ब्रिगेड.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.

शुभ रंग:– पांढरा, पिवळा, तांबडा.

शुभ रत्न:- पुष्कराज, मोती आणि माणिक.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)Marathi Rashi Bhavishya

मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
कामात उत्साह राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. घाईघाईने निर्णय घेणे टाळा.

वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. नियोजनपूर्वक काम करा.

मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
संवादकौशल्याचा चांगला उपयोग होईल. व्यापारी वर्गासाठी दिवस अनुकूल आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आर्थिक लाभाचे योग आहेत. नवीन जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका.

सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
कामात प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आर्थिक नियोजनातून फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी लाभदायक ठरतील.

कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
आर्थिक व्यवहारात फायदा होईल. नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबीयांकडून सहकार्य मिळेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

तुळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
राशीस्थानी चंद्रामुळे आत्मविश्वास वाढेल. चंद्र-मंगळ त्रिकोणामुळे उत्साह आणि कार्यक्षमता वाढेल. चंद्र-गुरू केंद्र योगामुळे योग्य मार्गदर्शन मिळेल. नवीन कामात यश मिळेल.

वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कामातील अडचणी दूर होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे.

धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भागीदारीच्या कामात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवस चांगला आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत प्रगती होईल. सर्जनशील कार्यात यश मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते.

मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
घरगुती वातावरण आनंददायी राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. प्रवासाचे योग असून तो लाभदायक ठरू शकतो.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!