आजचे राशिभविष्य बुधवार, १२ ऑगस्ट २०२६

१२ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
आषाढ अमावस्या. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज वर्ज्य दिवस आहे. आषाढ दर्श अमावस्या, *दिपपूजन* नवीन कामे, मोठे व्यवहार आणि महत्त्वाचे निर्णय शक्यतो टाळावेत. आध्यात्मिक साधना, पितृस्मरण व दानधर्मासाठी दिवस अनुकूल आहे.”
नक्षत्र – पुष्य / दुपारी १.०५ नंतर आश्लेषा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क. (व्यतिपात योग, दोन्ही करण अशुभ)
रवी युती चंद्र.
चंद्र त्रिकोण शनी.
बुध लाभ हर्षल.
बुध त्रिकोण नेपच्यून.
शुक्र त्रिकोण हर्षल.

राशिभविष्य –(Marathi Rashi Bhavishya)

मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
संयमाने काम करा. अनावश्यक वाद टाळा. वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल. आर्थिक व्यवहार पुढे ढकलल्यास चांगले.

वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
घरगुती वातावरण शांत राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
बुधाच्या शुभ प्रभावामुळे नवीन कल्पना सुचतील. संवादकौशल्यामुळे कामे पूर्ण होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
रवी-चंद्र युतीमुळे मानसिक चंचलता जाणवू शकते. चंद्र-शनी त्रिकोणामुळे संयम ठेवल्यास यश मिळेल. कुटुंबासाठी वेळ द्या.

सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन कामे पुढे ढकलणे हिताचे ठरेल.

कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
शैक्षणिक व बौद्धिक कार्यात प्रगती होईल. बुध-नेपच्यून त्रिकोणामुळे कल्पकता वाढेल. निर्णय घेताना वास्तवाचा विचार करा.

तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
भागीदारीच्या कामात संयम ठेवा. मित्रांचे सहकार्य मिळेल. आर्थिक नियोजनावर भर द्या.

वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
अनावश्यक खर्च टाळा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. मानसिक शांतता लाभेल. वादविवाद टाळा.

धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला लाभदायक ठरेल.

मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
कामात शिस्त आणि संयम ठेवा. चंद्र-शनी त्रिकोणामुळे जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक स्थिती स्थिर राहील.

कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन कल्पनांचा योग्य उपयोग होईल. प्रवास शक्यतो टाळा. संयमाने वागा.

मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. शुक्र-हर्षल त्रिकोणामुळे नवीन संधी मिळू शकतात. भावनिक निर्णय टाळून विवेकाने वागा.

१२ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर गुरु, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्यात अधिकार वृत्ती आणि प्रामाणिक पणा आहे. तुम्ही ध्येयवादी आहात. तुम्ही कार्यालयीन कामात अग्रेसर असतात. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात. तुम्हाला कला, ज्ञान, मनोरंजन यांची आवड असते. प्रतिभाशक्ती उच्च असते. तुम्ही एक चांगले लेखक होऊ शकतात. महत्वाकांक्षा आहे मात्र विनाकारण अहंकार टाळला पाहिजे. तुम्हाला आयुष्यात एकाकीपणा जाणवतो. भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल अधिक आकर्षण असते. ज्यांच्यावर अन्याय झालाआहे आशा लोकांबद्दल तुम्हाला सहानुभती असते. तुमचा स्वभाव हळुवार आणि संवेदनशील आहे. तुम्हाला इतरांशी सहज संवाद साधता येतो. दया, न्याय, सात्विकता, नैतिकता, परोपकार ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही सहसा संयमी असतात मात्र ज्या वेळी शनीचा प्रभाव वाढतो त्यावेळी तुम्ही भावना प्रधान होतात. तुम्हाला स्वतःचे काम स्वतः करायला आवडते. इतरांची ढवळाढवळ चालत नाही. तुम्ही महत्वाकांक्षी असून एखादी योजना पार पाडायची असेल तेव्हा तुम्हाला एकटे राहणे आवडते. तुमचा ओढा बंधुमान , संशोधक, हुशार व्यक्तीकडे असतो. तुम्हा जीवनात चांगले यश मिळते. तुमचा सतत उत्कर्ष होतो. तुम्ही एक उत्तम न्यायाधीश, धर्मगुरू, शिक्षक बनू शकतात. तुम्ही स्वयंपूर्ण आहात. तुम्हाला दिखाऊपणा आणि मोठ्याने बोलण्याची सवय असू शकते. तुमचे मन तरुण आणि स्वच्छंदी आहे. तुम्हाला मैदानी खेळांची आवड असते. तुम्ही सहिष्णू आणि विश्वासार्ह आहात. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून तुम्ही जागरूक राहणे आवश्यक आहे.

व्यवसाय:- न्यायमूर्ती, सेक्रेटरी, राजदूत, मुत्सद्दी, उच्चपदस्थ अधिकारी, संरक्षण खाते, प्राध्यापक, धार्मिक प्रवचनकार, डॉक्टर, शिक्षक, लेखक, मोल्डिंग, तेल गिरण्या, शेती, जंगल, कारखाने, लाकूड, खनिज द्रव्य, खाद्यपदार्थ.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, लसण्या, अमेथीस्ट.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)Marathi Rashi Bhavishya

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!