आजचे राशिभविष्य रविवार, २० सप्टेंबर २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya,)
भाद्रपद शुक्ल नवमी / संध्याकाळी ५.५२ नंतर दशमी.
वर्षा ऋतू. पराभवनाम संवत्सर.
“आज चांगला दिवस आहे”
चंद्रनक्षत्र – पूर्वाषाढा. राशी – धनु.
*अदुःख नवमी. भागवत सप्ताह आरंभ.*
चंद्र केंद्र बुध, चंद्र केंद्र शनी, शुक्र ष हर्षल.

२० सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya,)
तुमच्यावर चंद्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा भाग्योदय पाणथळ जागी होतो. मित्र परिवार मोठा असतो. विवाहानंतर भाग्योदय होतो. वैचारिक लेखनाची आवड असते. भोवतो ढोंगी मित्रांचे जाळे असते. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी तुमचा भावनिक दृष्टीकोन असतो. वक्तृत्व आणि शब्दभांडार चांगले असते. आत्मविश्वास असू दुबळ्या लोकांना मदत करणे आवडते. तुम्ही ध्येयवादी आहात आणि तुमच्या मध्ये प्रचंड कल्पनाशक्ती आहे. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुम्ही अतिशय हळवे असून लवकर अस्वस्थ होतात. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही प्रत्यक्षात रूपांतर करू शकतात. तुम्हाला जुगार किंवा कोडे सोडवण्याचा छंद असतो. तुम्ही कष्टाळू पाहणी शांत असतात मात्र तडजोड करत नाहीत. विनाकारण काळजी करण्याचा स्वभाव असून मन कष्टी असते. भाषणे, लेखन आणि श्रुतिका लिहिणे तुम्हा आवडते. तुमचे विचार स्वतंत्र आहेत. तुम्हाला मानसन्मान मनापासून आवडतात. तुम्ही समाजामध्ये मिसळतात. कोणत्याही गोष्टीतील नावीन्य आणि प्रवासाची तुम्हाला आवड आहे. तुम्ही हुशार आहात आणि शास्त्राची आवड आहे. तुमचा सहवास इतरांना उत्साहवर्धक वाटतो. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला बरे आणि वाईट नीटपणे समजते. नवनवीन कल्पना आणि भरपूर उत्साह यांचा संगम झाल्याने तुम्ही मोठमोठ्या प्रकल्पात काम करू शकतात. तुम्हाला स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे आवडते. तुमचा स्वभाव विनम्र असून तुम्ही कायदा प्रेमी आहात. तुम्ही अधिक वयस्कर माणसांकडे आकर्षित होतात.

व्यवसाय:- लेखक, वक्ता, पुढारी, डॉक्टर, केमिस्ट, बँकिंग, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, सचिव.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पांढरा, निळा, पिवळा.

शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

राशिभविष्य

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. नवीन संधी चालून येतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक नियोजन करणे फायदेशीर ठरेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दिवस चांगला आहे. मन उत्साही राहील. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. प्रवास कार्यसाधक ठरतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामाचा ताण जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) भाग्याची साथ मिळेल. कामानिमित्त प्रवास घडेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मन प्रसन्न राहील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार जपून करा. संयमाने निर्णय घ्या.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. भागीदारीतून लाभ होईल. सामाजिक संपर्क वाढतील. मनासारखी कामे होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक लाभ होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. नवीन संधी चालून येतील. मेहनत वाढवावी लागेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. नवीन ज्ञान मिळेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होऊ शकतो. नवीन ओळखी होतील. कामात प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लाभदायक दिवस आहे. पराक्रम गाजवाल. भावंडांचे सहकार्य मिळेल. नातेसंबंधातून लाभ होण्याची शक्यता आहे.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील, मात्र खर्चही वाढू शकतो. छोटी सहल घडेल. आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्या.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!